कारागृहातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

By Admin | Updated: October 3, 2015 02:36 IST2015-10-03T02:36:04+5:302015-10-03T02:36:04+5:30

डी.बी. पथकाची कारवाई; आरोपी अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहामधून झाला होता पसार.

Prisoner absconding police custody | कारागृहातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कारागृहातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

वाशिम : एक वर्षापुर्वी अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहामधून पसार झालेला आरोपी मोहन मोतिराम चव्हाण याचा वाशिम शहर पोलिसांनी शोध घेऊन त्याला २ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले. अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनमध्ये मोहन चव्हाण (रा. धुमका ता.जि. वाशिम) याच्याविरूध्द भादंविचे कलम २२४ अन्वये गुन्हा दाखल आहे. एक वर्षापुर्वी चव्हाण याने पोलिसांना गुंगारा देऊन कारागृहामधून पलायन केले होते. त्याचा गेल्या एक वर्षापासुन पोलीस शोध घेत आहेत. अखेर, फरार आरोपी चव्हाण याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात शहर पोलिस स्टेशनच्या डीबी पथकाला यश आले. या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक उदय सोयस्कर, पोलिस शिपाई राजेश बायस्कर, मंगेश नरवाडे, अमोल गिर्‍हे यांचा समावेश होता.

Web Title: Prisoner absconding police custody