गणेश विसर्जनासाठी शिरपूर ग्रामपंचायतची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:42 IST2021-09-19T04:42:13+5:302021-09-19T04:42:13+5:30

गेल्या ...

Preparation of Shirpur Gram Panchayat for immersion of Ganesha | गणेश विसर्जनासाठी शिरपूर ग्रामपंचायतची तयारी

गणेश विसर्जनासाठी शिरपूर ग्रामपंचायतची तयारी

गेल्या १० सप्टेंबरपासून शिरपूर येथे प्रशासनाच्या आवाहनानुसार अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. गावात ११ मंडळांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून, १९ सप्टेंबर रोजी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. यासाठी पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतने विशेष तयारी करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी नजीकच्या ठिकाणी शांततेत विनामिरवणूक गणेश विसर्जन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांनी केले आहे.

गणेश विसर्जनानिमित्त विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

००००००००००००००

घरगुती गणेश विसर्जनासाठी सजविलेले ट्रॅक्टर

शिरपूर येथे घरगुती गणपतीसाठी ग्रामपंचायत व पोलीस स्टेशनकडून प्रत्येकी एक असे दोन सजविलेले ट्रॅक्टर तयार करण्यात आले आहेत. या ट्रॅक्टरमध्ये घरगुती गणपती विसर्जनासाठी ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायत व पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Preparation of Shirpur Gram Panchayat for immersion of Ganesha