वाशिम शहरातील विविध भागात नागरीकांना नळावाटे गढुळ पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 01:00 PM2018-01-08T13:00:40+5:302018-01-08T13:01:57+5:30

वाशिम : शहरातील विविध भागात नळावाटे नागरीकांना गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे चित्र विविध प्रभागात दिसून येत असून या दुर्गंधीयुक्त व गढुळ असलेले हे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.

Poor water supply to people in different areas of Washim city | वाशिम शहरातील विविध भागात नागरीकांना नळावाटे गढुळ पाण्याचा पुरवठा

वाशिम शहरातील विविध भागात नागरीकांना नळावाटे गढुळ पाण्याचा पुरवठा

Next
ठळक मुद्देपावसाळ्यात पाण्याची सरासरी कमी झाल्यामुळे एकबुर्जी जलाशयात पाण्याची पातळी कमी आहे.अशातच शहरातील काही प्रभागात गढुळ व दुषित पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात आहे. हे पाणी पिल्यामुळे नागरीकांना विविध आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

वाशिम : शहरातील विविध भागात नळावाटे नागरीकांना गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे चित्र विविध प्रभागात दिसून येत असून या दुर्गंधीयुक्त व गढुळ असलेले हे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे  पाण्याची पातळी खालावली असल्याने हा परिणाम असल्याचे बोलल्या जाते. 

    शहरातील विविध प्रभागात नागरीकांनी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागामार्फत पाईपलाईनव्दारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. पावसाळ्यात पाण्याची सरासरी कमी झाल्यामुळे एकबुर्जी जलाशयात पाण्याची पातळी कमी आहे.  त्यामुळे विविध प्रभागातील नागरीकांना आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.  त्यामुळे नागरीकांना हे पाणी साठवून ठेवावे लागते.  अशातच शहरातील काही प्रभागात गढुळ व दुषित पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे नागरीकांच्या निदर्शनास येत आहेण्. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी कसे वापरावे असा प्रश्न नागरीकांसमोर उभा आह.  शहरातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही गेल्या कित्येक वषार्पासून बदलली गेली नसल्यामुळे ती ठिकठिकाणी गंजुन खराब झाली आहे. शहरात गेल्या अनेक वषार्पासून भुयारी गटार योजनेचे काम सुरु असून त्यामुळे ठिकठिकाणी नाल्या व रस्ते खोदण्यात आले होते. या खोदकामामुळे अनेक ठिकाणची नळाची पाईपलाईन उध्दवस्त झाली असून नागरीकांना ती स्वतरू दुरुस्त करावी लागत आहेण् अनेक ठिकाणी लोखंडी व काही ठिकाणी पीव्हीसी पाईनलाईन असल्यामुळे ही पाईपलाईन वारंवार फुटते. अशातच काही ठिकाणी ही पाईपलाईन नालीमधून गेल्यामुळे पाईपलाईन फुटल्यास नालीमधील घाण पाणी या पाईपलाईनमध्ये घुसतेण् हे घाणमिश्रीत पाणी पिल्यामुळे नागरीकांना विविध आजाराचा सामना करावा लागतोण् अशातच गेल्या काही दिवसांपासून शहरात ठिकठिकाणच्या प्रभागात नागरीकांना गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे.  या पाण्याला एक प्रकारचा घाण दर्प असल्याचा अनुभव नागरीकांना येत असून हे पाणी पिल्यामुळे नागरीकांना विविध आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरीकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे त्वरीत लक्ष देवून नागरीकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरीकांमधून होत आहे. 

Web Title: Poor water supply to people in different areas of Washim city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.