शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाच्या शेताला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST

वाशिम : जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंब लखपती होण्यासाठी प्रत्येकाच्या शेताला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी महात्मा गांधी ...

वाशिम : जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंब लखपती होण्यासाठी प्रत्येकाच्या शेताला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून करावयाच्या कामांचा गावनिहाय तंत्रशुद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना मृद व जलसंधारण, रोजगार हमी योजना विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी दिल्या. ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात जिल्ह्यातील रोहयो कामांचा आढावा घेताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, दांगट, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नंदकुमार म्हणाले, वाशिम हा आकांक्षित जिल्हा असून शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब लखपती बनविण्यासाठी शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. ‘मनरेगा’अंतर्गत जलसंधारणाची कामे करून गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावातच थांबविण्याचे नियोजन करावे. या अनुषंगाने गावनिहाय ‘जीएसआय’ आधारित आराखडा तयार करावा. पहिल्या टप्प्यात ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’अंतर्गत निवड झालेल्या मानोरा व मालेगाव तालुक्यातील गावांचे सर्वेक्षण करून आराखडे तयार करावेत. यासोबतच जिल्ह्यात फळबाग लागवड, शेतमालासाठी गोडावून उभारणीसाठी सुद्धा प्रयत्न करावेत, अशा सूचनाही दिल्या.

..............

अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना

जिल्ह्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्यातील अपूर्ण कामांचे सर्वेक्षण करून त्या कामांच्या सद्य:स्थितीविषयक माहिती संकलित करावी. तसेच ही कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी. जिल्ह्यात नवीन जॉब कार्ड तयार करणे, तसेच बंद असलेली जॉब कार्ड कार्यान्वित करण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचनाही नंदकुमार यांनी दिल्या.