पपई पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 04:03 PM2020-05-11T16:03:12+5:302020-05-11T16:03:23+5:30

बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांची वाढ खुंटल्याने बांबर्डा परिसरातील पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

Outbreak of fungal disease on papaya crop! | पपई पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव!

पपई पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बांबर्डा (वाशिम) : पारंपरिक पिकांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकºयांनी पर्यायी पिकपद्धती अंगीकारून पपई उत्पादनाकडे लक्ष केंद्रीत केले; मात्र या पिकावरही सद्य:स्थितीत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांची वाढ खुंटल्याने बांबर्डा परिसरातील पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारा यासारख्या नैसर्गीक संकटांमुळे गत काही वर्षांपासून खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे काही प्रयोगशील शेतकºयांनी पर्यायी पिकपद्धतीचा अवलंब केला असून बांबर्डा परिसरातील शेतकरी पपई लागवडीकडे वळले आहेत. यंदाही अनेक शेतकºयांनी पपईची लागवड केली असून चांगला दर व एकरकमी पैसा शेतकºयांच्या हाती येत असल्याने पपईच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. यासाठी शेतकºयांनी तायवान या नवीन विकसित वाणाची निवड केली. पपई हे उष्ण कटीबंधात वाढणारे पिक असून वर्षभरात जून, जुलै, सप्टेंबर-आॅक्टोंबर व जानेवारी-फेब्रुवारी अशा ३ टप्प्यात पपईची लागवड केल्या जाते; मात्र जून-जुलै व सप्टेंबर-आॅक्टोंबर या महिन्यात पपईची लागवड केल्यास पावसामुळे शेताचे रस्ते चिखलमय असल्याने तयार झालेला माल शेताबाहेर काढण्यास शेतकºयांना अडचण जाणवते म्हणून साधारणपणे जानेवारी ते मार्च यादरम्यान बांबर्डा परिसरात पपईची लागवड केल्या जाते. परिसरात मागील वर्षीपेक्षा पपईच्या क्षेत्रात वाढ झाली असताना त्यावर आलेल्या बुरशीजन्य रोगामुळे मात्र उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे.
या बुरशीजन्य रोगामुळे पपईच्या झाडाची पाने पिवळी होऊन गळत आहे. उत्पादक शेतकºयांनी रोगापासून बचावाकरिता आतापर्यंत महागड्या बुरशीनाशकाची फवारणीे केली. तरीही रोग नियंत्रणात येत नसून कृषी विभागाने पपई उत्पादक शेतकºयांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Outbreak of fungal disease on papaya crop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.