शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

नव्यापेक्षा जुने सोयाबीनच खातेय भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST

वाशिम : नवीन सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत दाखल झाले असून, प्रति क्विंटल ८,२८१ रुपये दर मिळाला आहे. जुन्या सोयाबीनला ...

वाशिम : नवीन सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत दाखल झाले असून, प्रति क्विंटल ८,२८१ रुपये दर मिळाला आहे. जुन्या सोयाबीनला ९,४०० रुपये दर असल्याने नवीनच्या तुलनेत जुने सोयाबीनचा भाव खात असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटातून जावे लागते. शेतमाल घरी आल्यानंतर विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेतमाल विक्री करावा लागतो. अल्प भूधारक शेतकरी तर शेतमाल तयार झाला की बाजार समितीत विक्रीसाठी आणतो. मध्यम व श्रीमंत वर्गातील काही शेतकरी भाववाढ होईल या अपेक्षेने पाच ते सहा महिने सोयाबीनची विक्री थांबवू शकतात. ऐन हंगामात सोयाबीनला २,६०० ते ४,००० या दरम्यान प्रति क्विंटल दर असतो. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांना अल्पदरात सोयाबीनची विक्री करण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो. गत महिनाभरापासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार पाहावयास मिळत आहे. आता नवीन सोयाबीन बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. वाशिमच्या बाजार समितीत शनिवार, ४ सप्टेंबरपासून नवीन सोयाबीन विक्रीसाठी आले. यावेळी या सोयाबीनला प्रति क्विंटल ६,७०० ते ८,२८१ रुपये भाव मिळाला. दुसरीकडे जुन्या सोयाबीनला मात्र ७,००० ते ९,४०० रुपये भाव मिळाला. नवीन सोयाबीन बाजार समितीत येत असल्याने हाच भाव कायम राहील का, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

....................

भाव गडगडण्याची शक्यता

नवीन सोयाबीन बाजारात येत असल्याने बाजारभाव गडगडण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. बाजारभाव गडगडले तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.

......................

शेतकरी म्हणतात, बाजारभाव कायम राहावेत

कोट

सोयाबीनच्या ऐन हंगामात बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव दरवर्षीच शेतकऱ्यांना येतो. आता सोयाबीन तयार होत असल्याने यापूर्वी असलेला बाजारभाव मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. मात्र, बाजारभाव पुन्हा गडगडतील, अशी दाट शक्यता आहे.

- पांडुरंग सोळंके

प्रगतिशील शेतकरी

...................

शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटांमधून जावे लागते. शनिवारी बाजार समितीत नव्या सोयाबीनला आठ हजारांवर भाव मिळाला ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे; परंतु हाच भाव यापुढेही कायम राहिला तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

- संजयकुमार सरनाईक

प्रगतिशील शेतकरी