शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नव्यापेक्षा जुने सोयाबीनच खातेय भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:49 IST

वाशिम : नवीन सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत दाखल झाले असून, प्रति क्विंटल ८२८१ रुपये दर मिळाला आहे. जुन्या सोयाबीनला ...

वाशिम : नवीन सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत दाखल झाले असून, प्रति क्विंटल ८२८१ रुपये दर मिळाला आहे. जुन्या सोयाबीनला ९४०० रुपये दर असल्याने नवीनच्या तुलनेत जुनी सोयाबीनचा भाव खात असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटातून जावे लागते. शेतमाल घरी आल्यानंतर विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेतमाल विक्री करावा लागतो. अल्प भूधारक शेतकरी तर शेतमाल तयार झाला की बाजार समितीत विक्रीसाठी आणतो. मध्यम व श्रीमंत वर्गातील काही शेतकरी भाववाढ होईल या अपेक्षेने पाच ते सहा महिने सोयाबीनची विक्री थांबवू शकतात. ऐन हंगामात सोयाबीनला २६०० ते ४००० या दरम्यान प्रति क्विंटल दर असतो. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांना अल्पदरात सोयाबीनची विक्री करण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो. गत महिनाभरापासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार पाहावयास मिळत आहे. आता नवीन सोयाबीन बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. वाशिमच्या बाजार समितीत शनिवार, ४ सप्टेंबरपासून नवीन सोयाबीन विक्रीसाठी आले. यावेळी या सोयाबीनला प्रति क्विंटल ६७०० ते ८२८१ रुपये भाव मिळाला. दुसरीकडे जुन्या सोयाबीनला मात्र ७००० ते ९४०० रुपये भाव मिळाला. नवीन सोयाबीन बाजार समितीत येत असल्याने हाच भाव कायम राहील का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

....................

भाव गडगडण्याची शक्यता

नवीन सोयाबीन बाजारात येत असल्याने बाजारभाव गडगडण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. बाजारभाव गडगडले तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.

......................

शेतकरी म्हणतात, बाजारभाव कायम राहावेत

कोट

सोयाबीनच्या ऐन हंगामात बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव दरवर्षीच शेतकऱ्यांना येतो. आता सोयाबीन तयार होत असल्याने यापूर्वी असलेला बाजारभाव मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. मात्र, बाजारभाव पुन्हा गडगडतील, अशी दाट शक्यता आहे.

- पांडुरंग सोळंके

प्रगतिशील शेतकरी

...................

शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटांमधून जावे लागते. शनिवारी बाजार समितीत नव्या सोयाबीनला आठ हजारांवर भाव मिळाला ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे; परंतु हाच भाव यापुढेही कायम राहिला तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

- संजयकुमार सरनाईक

प्रगतिशील शेतकरी