शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आता आव्हान बंडखोरी शमविण्याचे

By admin | Updated: September 29, 2014 02:26 IST

वाशिम जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात बंडखोरी.

विवेक चांदुरकर / वाशिमजिल्हयातील तीनही विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षात बंडखोरी झाली असल्यामुळे उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसापर्यंत पक्षांपुढे बंडखोरी शमविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तसेच पक्षबदलही झाले आहेत. निवडणुकीत अनेक उमेदवार केवळ पैसे कमविण्यासाठीही अर्ज दाखल करतात. त्यामुळे यामध्ये पैशांचा घोडाबाजार मोठय़ा प्रमाणात चालणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पक्षांची उमेदवार निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी युती व आघाडी तुटल्यामुळे अनेकांना आ पल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. उमेदवारी मिळविण्याकरिता नेत्यांनी मुंबईत ठाण मांडले होते. मात्र, ऐनवेळेवर दुसर्‍या पक्षातील नेत्यांना उमेदवारी दिल्यामुळे अनेक इच्छूकांना धक्का बसला व त्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करून पक्षाला हादरा देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकच पक्षात बंडखोरी झाली. जिल्ह्यात कारंजा म तदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार तथा विदर्भ वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश डहाके यांना डावलून माजी मंत्री सुभाष ठाकरे यांना पक्षाच्यावतीने उमेदवारी देण्यात आली.त्यामुळे डहाके यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. काँग्रेसची उमेदवारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्योती गणेशपुरे यांना मिळाली असून, माजी मंत्री तथा कारंजाचे माजी आमदार बाबासाहेब धाबेकर यांचा मुलगा सुनील धाबेकर यांनीही अपक्ष म्हणून कारंजातून उमेदवारी दाखल केली आहे. गतवेळी वाशिम मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणार्‍या माजी जिल्हाध्यक्ष अल्का मकासरे यांनी यावेळी पक्षाने माजी आमदार सुरेश इंगळे यांना उमेदवारी दिल्यामुळे अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. तसेच जिल्ह्यात काही पक्षबदलही झाले. वाशिममध्ये भाजपाचे सरचिटणीस डॉ. दीपक ढोके यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आ पली उमेदवारी दाखल केली. रिसोड विधानसभा मतदारसंघात मनसेतर्फे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून यामध्ये पती पत्नी विजयी झालेले विश्‍वनाथ सानप यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी शिवसेनेतर्फे आपली उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीत आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी व्हावे, याकरिता सर्वच पक्ष आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे बंडखोरांना शमवून त्यांना आपल्या बाजुने करण्यासाठी पक्षाच्या उमेदवारांच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची १ ऑक्टोबर ही अखेरची मुदत आहे. यामध्ये मतदारसंघात अनेक घडामोडी घडणार आहेत.