शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

२९ उमेदवारांचे नामांकन वैध

By admin | Updated: July 26, 2014 22:07 IST

जिल्हा नियोजन समितीची निवडणूक

वाशीम : जिल्हा विकासाच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळणार्‍या जिल्हा नियोजन समितीच्या निवडून द्यावयाच्या २१ सदस्यपदासाठी २९ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये सदस्यत्वासाठी चुरस असल्याचे जवळपास निश्‍चीत आहे. अर्थात दाखल वा अपात्र अर्जासंबंधी जिल्हाधिकार्‍यांकडे अपिल करावयाचा कालावधी व त्यांनी घ्यावयाच्या निर्णयानंतर म्हणजे ४ ऑगस्टनंतर यासंबंधी अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहे. नियोजनानुसार जिल्हा नियोजन समितीमध्ये नागरी क्षेत्रामधून सर्वसाधारण प्रवर्गातील १ व ग्रामीण क्षेत्रातून २0 सदस्य निवडून देणे अपेक्षीत आहे. या २0 सदस्यांमध्ये अनुसूचित जातीमधील २, अनुसूचित जाती स्त्री २, अनुसूचित जमाती १, अनुसूचित जमाती स्त्री १ , नागरिकांचा मागास प्रवर्गातून ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ३, सर्वसाधारण ५, सर्वसाधारण स्त्री ३ अशा सदस्यांचा समावेश आहे. सदस्यत्वासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करावयाच्या २३ जुलैपर्यंतच्या मुदतीपर्यंत नागरी क्षेत्रातून एका जागेसाठी ५ तर ग्रामीणमधून २0 जागांसाठी तब्बल ३७ अर्ज सादर करण्यात आले होते. नामनिर्देशनपत्र छाननीनंतर नागरी भागातील १ तर ग्रामीण भागातील ५ अर्ज अवैध ठरले. नागरी भागातील उर्वरित चारही इच्छुकांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती असून, ग्रामीण भागातील जे ३७ अर्ज वैध ठरले होते त्यापैकी काहींनी एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्याने वैध अर्जापैकी २५ जणांचे प्रत्येकी एक असे २७ अर्ज नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी पात्र ठरल्याची माहिती आहे. फेटाळल्या गेलेल्या अर्जकर्त्यांना २८ जुलैपर्यंत जिल्हाधिकार्‍यांकडे अपील करण्याचा अवधी असून, अपिलानंतर वैध नामनिर्देशनपत्राची अंतिम यादी ४ ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार असून ५ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत राहणार आहे. निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी ६ ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार आहे. तोवरी अपेक्षीत संख्येपेक्षा अधिक इच्छुक राहिल्यास आवश्यकता पडल्यास २६ जुलैला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान व २७ जुलै रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मतमोजणी होऊन मतदानाचा निकाल घोषित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन विभागाने दिली.