शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नवनिर्मित वाशिम-शेलूबाजार रस्त्याची वर्षभरातच दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST

जिल्हा मुख्यालयास जोडणाऱ्या वाशिम-शेलूबाजार मार्गाला दोन वर्षांपूर्वी प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा दिल्यानंतर या रस्त्याचे नूतनीकरण व रुंदीकरण करण्यात आले ...

जिल्हा मुख्यालयास जोडणाऱ्या वाशिम-शेलूबाजार मार्गाला दोन वर्षांपूर्वी प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा दिल्यानंतर या रस्त्याचे नूतनीकरण व रुंदीकरण करण्यात आले आणि वर्षभरापूर्वीच या रस्त्यावर वाहतूकही सुरू झाली. आता या मार्गावर शेलूबाजारमार्गे कारंजा, अमरावती, नागपूर आणि यवतमाळकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. शिवाय वाशिम-मालेगाव अकोला रस्त्याची अवस्था वाईट असल्याने वाशिम येथून अकोलाकडे जाण्यासाठी रुग्णवाहिका, मालवाहू वाहने याच मार्गाचा अवलंब करतात. या मार्गावरील पिंप्री अवगण ते चिखलीपर्यंतचा रस्ता हा वाइल्ड लाइफच्या अडथळ्यामुळे एकपदरीच करण्यात आला आहे. या रस्त्याच्या कडा त्यावेळी गिट्टीने दबाई करून भरल्या गेल्या होत्या; परंतु एक पदरी रस्त्यावर वाहने वेगात चालविण्यासह समोरच्या वाहनाला मार्ग देण्यासाठी रस्त्याच्या खाली उतरविली जात आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेलगतची खडी उखडून कमी झाली, तर पावसामुळे रस्त्याच्या कडा खोलगट झाल्या आहेत. आता एकपदरी रस्त्यावर दोन वाहने समाेरासमोर आल्यास बाजू घेताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

-----------

पिंपरी ते गोगरीदरम्यानच्या पुलाची दुरवस्था

वाशिम-शेलूबाजार मार्गावर पिंप्री खुर्द ते गोगरी फाट्यादरम्यानच्या पुलाजवळ पावसाच्या पाण्यामुळे मोठी दरी पडली आहे. एखाद्या वाहन चालकाने वेगात बाजू घेण्याचा प्रयत्न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंप्री ते चिखली झोलेबाबा गावापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कडा भरणे गरजेचे आहे.