शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

वाळकीवासीयांची शास्त्रशुद्ध पद्धतीने दुष्काळावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 15:16 IST

शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी खेळत असून माती अडविण्याचा प्रयोगही यशस्वी झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दुष्काळाच्या दृष्टचक्रातून कायमचे बाहेर पडायचे असेल तर शेतशिवारांमध्ये पाणी अडविण्यासोबतच वाहून जाणारी सुपीक माती धुऱ्याच्या बाहेर जाता कामा नये, हे सूत्र अंगीकारून तालुक्यातील वाळकी-दोडकी येथील शेतकऱ्यांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने जल व मृद संधारणाचे काम करण्यात आले. यामुळे सद्या तेथील शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी खेळत असून माती अडविण्याचा प्रयोगही यशस्वी झाला आहे.पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक, राज्यस्तरीय महात्मा फुले जलमित्र पुरस्कारप्राप्त शेतकरी सुभाष नानवटे यांनी गत तीन ते चार वर्षांपासून गावाला दुष्काळाच्या छायेतून कायमचे बाहेर काढण्यासाठी गावकºयांच्या सहकार्याने विविध स्वरूपातील प्रयोग केले. त्यात प्रामुख्याने शेतशिवारांमध्ये ठिकठिकाणी सीसीटी, दगडी बांध, माती नाला बांध, धुºयावर वृक्षलागवड आदी उपक्रमांचा समावेश आहे. जलसंधारणाची ही कामे परिणामकारक ठरली असून माथ्यावरून वाहून जाणारे पाणी व त्यासोबतच वाहून जाणारी माती अडविणे साध्य झाले आहे.शेतशिवारांमध्ये विविध ठिकाणी श्रमदानातून प्रत्येक एक घनमीटर खोलीचा खड्डा तयार करण्यात आला. प्रत्येक खड्डयात हजार लीटर याप्रमाणे लाखो लिटर पाणी साठविणे यामुळे शक्य झाले. शेतातील ज्या भागातून माती वाहून जाते, त्याठिकाणी ‘रिचार्ज पीट’ तयार करण्यात आले. यामुळे शेतांमधील सुपीक माती शेतातच राहून उत्पादनात वाढ झाल्याचे सुभाष नानवटे यांनी सांगितले. 

खरीप व रब्बी हंगामात भरघोस उत्पन्न गावात कधीकाळी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवायचे. पिकांना पाणी मिळत नसल्याने शेतकºयांना नापिकीचा सामना करावा लागायचा. जलसंधारणाच्या विविध कामांमुळे मात्र परिस्थिती पूर्णत: बदलली असून खरीप व रब्बी हंगामात भरघोस उत्पन्न मिळत असल्याची माहिती शेतकरी सुभाष नानवटे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी