शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

छायाचित्र नसणाऱ्या मतदारांची नावे यादीतून वगळणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:56 IST

जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, वाशिम व कारंजा अशा सहाही तालुक्यात अनेक मतदारांचे मतदान कार्डवर रंगीत छायाचित्र नाही. मतदान ...

जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, वाशिम व कारंजा अशा सहाही तालुक्यात अनेक मतदारांचे मतदान कार्डवर रंगीत छायाचित्र नाही. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) स्थळ पंचनामा केल्यानंतर अनेकजण स्थायी पत्त्यावर राहत नसल्याचे निदर्शनात आले आहे. कारंजा तालुक्यात बीएलओ यांनी स्थळ पंचनामा करून ६०३ जणांची नावे मतदार यादीमधून वगळण्यासाठी नमुना ७ चे अर्ज कारंजा तहसीलदार कार्यालयास सादर केले आहेत. या ६०३ मतदारांची यादी कारंजा तहसीलदार कार्यालय, कारंजा नगरपरिषद, पंचायत समिती तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. वाशिम, रिसोड, मालेगाव, मानोरा आदी तालुक्यातही नावे वगळण्यात येणाऱ्या मतदारांच्या नावाची अशी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीमध्ये छायाचित्र नसणाऱ्या मतदारांचे छायाचित्र संकलित करण्यासाठी बीएलओ यांनी त्यांच्या मतदार यादीतील मतदारांच्या पत्त्यावर भेटी दिल्या; मात्र संबंधित मतदार त्या पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले. तसेच त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचे छायाचित्र संकलित करणे शक्य झाले नाही. परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षरीने बीएलओ यांनी याबाबतचा स्थळ पंचनामा केला आहे. अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी नमुना ७ अर्ज कारंजा तहसीलदार कार्यालयात सादर केले आहेत. मतदार यादीतून वगळण्यात येणाऱ्या कारंजा तालुक्यातील ६०३ व्यक्तींच्या नावाची यादी उपरोक्त ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत कोणालाही आक्षेप असल्यास १ मार्च २०२१ पर्यंत आपले आक्षेप अर्ज मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कारंजा किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, कारंजा यांच्या कार्यालयात सादर करावे लागणार आहेत.