शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

छायाचित्र नसणाऱ्या मतदारांची नावे यादीतून वगळणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 5:07 PM

Washim News जिल्ह्यातील संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.

वाशिम : मतदान कार्डवर छायाचित्र नसणे, स्थलांतरण, स्थायी पत्यावर न राहणे आदी कारणावरून जिल्ह्यातील संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. तत्पूर्वी संबंधितांकडून १ मार्चपर्यंत आक्षेप मागविले आहेत.जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, वाशिम व कारंजा अशा सहाही तालुक्यात अनेक मतदारांचे मतदान कार्डवर रंगित छायाचित्र नाही. मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांनी (बीएलओ) स्थळ पंचनामा केल्यानंतर अनेकजण स्थायी पत्त्यावर राहत नसल्याचे निदर्शनात आले आहे. कारंजा तालुक्यात बीएलओ यांनी स्थळ पंचनामा करून ६०३ जणांची नावे मतदार यादीमधून वगळण्यासाठी नमुना ७ चे अर्ज कारंजा तहसीलदार कार्यालयास सादर केले आहेत. या ६०३ मतदारांची यादी कारंजा तहसीलदार कार्यालय, कारंजा नगरपरिषद, पंचायत समिती तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. वाशिम, रिसोड, मालेगाव, मानोरा आदी तालुक्यातही नावे वगळण्यात येणाºया मतदारांच्या नावाची अशी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीमध्ये छायाचित्र नसणाऱ्या मतदारांचे छायाचित्र संकलित करण्यासाठी बीएलओ यांनी त्यांच्या मतदार यादीतील मतदारांच्या पत्त्यावर भेटी दिल्या; मात्र संबंधित मतदार त्या पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले. तसेच त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचे छायाचित्र संकलित करणे शक्य झाले नाही. परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षरीने बीएलओ यांनी याबाबतचा स्थळ पंचनामा केला आहे. अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी नमुना ७ अर्ज कारंजा तहसीलदार कार्यालयात सादर केले आहेत. मतदार यादीतून वगळण्यात येणाऱ्या कारंजा तालुक्यातील ६०३  व्यक्तींच्या नावाची यादी उपरोक्त ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत कोणालाही आक्षेप असल्यास १ मार्च २०२१ पर्यंत आपले आक्षेप अर्ज मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कारंजा किंवा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, कारंजा यांच्या कार्यालयात सादर करावे लागणार आहेत.

टॅग्स :washimवाशिम