आईनेच दिली पोटच्या मुलीला फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 03:05 PM2020-01-08T15:05:00+5:302020-01-08T15:05:10+5:30

गायत्री अमोल भगत (३२) असे आईचे नाव असून, तनिक्षा असे मृतक मुलीचे नाव आहे.

Mother kill her daughter by hang her | आईनेच दिली पोटच्या मुलीला फाशी

आईनेच दिली पोटच्या मुलीला फाशी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : आईने पोटच्या मुलीला फासावर लटकवून स्वत:ही गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील गिंभा येथे ७ जानेवारी रोजी घडली. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला आहे. गायत्री अमोल भगत (३२) असे आईचे नाव असून, तनिक्षा असे मृतक मुलीचे नाव आहे.
अमोल किसन भगत (३५) रा. गिंभा यांच्या तक्रारीनुसार, त्यांना तीन मुली आहेत. ७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान पत्नी गायत्री अमोल भगत ही तिन्ही मुलीला घेवुन मतदान करण्याकरिता जात होती. यावेळी कुठे जात आहे, असे पतीने विचारले असता मतदानाला जात असल्याचे गायत्रीने सांगितले. स्वयंपाकसंदर्भात विचारले असता, स्वयंपाक केला नसल्याचे तिने सांगितले. त्यानंतर अमोल भगत यांनी मोठी मुलगी समीक्षा व सर्वात लहान मुलगी प्रांजली यांना घेवुन घर गाठले. गायत्री व मुलगी तनिक्षा बऱ्याच वेळानंतरही घरी न आल्याने शोधाशोध केली. सकाळी १०.४५ वाजता गिंभा येथील पिंटु मुकिंदा नाकाडे यांनी फोनद्वारे संपर्क साधून सांगितले की, जनुना शेतशिवारात पत्नीने तनिक्षा भगत हिस फाशी देवुन जिवाने मारले तसेच ती सुध्दा फाशी घेण्याचा प्रयत्न करित असताना काही लोकांनी तिला पकडुन ठेवले आहे. यावरून अमोल भगत याने जनुना शेतशिवार गाठून तनिक्षाचे प्रेत ताब्यात घेतले. अमोल भगत यांच्या फिर्यादीवरून गायत्री भगत हिच्याविरूद्ध भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस दुपारी ३ वाजतादरम्यान अटक केली. सध्या जिल्हा परिषदेची निवडणुक सुरू असल्याने पोलीस कस्टडी रिमांडचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक वसंत परदेशी व वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मंगरूळपीर पोलीस करीत आहे.(तालुका प्रतिनिधी

Web Title: Mother kill her daughter by hang her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.