युवतीचा विनयभंग; तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:56 IST2021-02-20T05:56:45+5:302021-02-20T05:56:45+5:30

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड तालुक्यातील सवड येथील पीडित युवतीने पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, गावातीलच ...

Molestation of a young woman; Charges filed against three | युवतीचा विनयभंग; तिघांवर गुन्हा दाखल

युवतीचा विनयभंग; तिघांवर गुन्हा दाखल

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड तालुक्यातील सवड येथील पीडित युवतीने पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, गावातीलच विठ्ठल शंकर गाडे, वैभव श्रीकांत गाडे, दत्ता शंकर मगर या तिघांनी घरी एकटी असताना विनयभंग केला व तू दुसऱ्या कोणाशी लग्न कशी करते, ते बघून घेऊ. तुला जीवाने मारून टाकू, अशी धमकी दिली. यावेळी पीडितेने आरडाओरड केल्यानंतर नातलग धावून आले असता, तिघांनीही तेथून पळ काढला. त्यानंतर आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी मुलीच्या होणाऱ्या वरास धमकावले व जीवे मारण्याची धमकी देऊन पीडित मुलीचे लग्न मोडण्यास ते कारणीभूत ठरले, अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद तीनही आरोपींवर भादंविचे कलम ३५४, ३५४ ‘अ’, ४५२, ५००, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. पुढील तपास ठाणेदार एस.एम. जाधव करीत आहेत.

Web Title: Molestation of a young woman; Charges filed against three