शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

वाघळूद येथे रोहयो घोटाळा; १२४ बँक खाते केले सील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 12:37 IST

मालेगाव आणि वाशिम या दोन शहरांमधील बँकांमध्ये मजुरांच्या नावे अनधिकृतरित्या उघडण्यात आलेले १२४ बँक खाते सील करण्यात आले आहेत.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील वाघळूद (ता.मालेगाव) ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या तीन गावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामातील गैरव्यवहार सर्वप्रथम ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला. दरम्यान, याप्रकरणी गठीत स्वतंत्र पथकाकडून भ्रष्टाचाराची सखोल चौकशी सुरू असून मालेगाव आणि वाशिम या दोन शहरांमधील बँकांमध्ये मजुरांच्या नावे अनधिकृतरित्या उघडण्यात आलेले १२४ बँक खाते सील करण्यात आले आहेत.२०१५-१६ पासून वाघळूदसह मुठ्ठा आणि वाकद या तीन गावांमध्ये करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या विविध कामांमध्ये चुकीचा प्रकार अवलंबिण्यात आला. अल्पवयीन मुले, मयत झालेल्या माणसांसह कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या इसमालाही मजूर म्हणून दाखवून संबंधितांच्या नावे मस्टर काढण्यात आले. मजूरी आॅनलाईन पद्धतीने बँक खात्यात जमा होत असल्याने बँकांमध्येही बोगस खाते काढून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. याप्रकरणी वाघळूद येथील काही जागरूक नागरिकांनी ३१ जुलै २०१९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून सरपंच, रोजगार सेवक, ग्रामसेवकासह विविध बँकांच्या परस्पर समन्वयातून घडलेला भ्रष्टाचाराचा हा प्रकार उजागर केला. तसेच याप्रकरणी वाघळूदचे सरपंच कृष्णा देशमुख यांच्यासह अन्य दोषी असलेल्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर तत्काळ फौजदारी स्वरूपातील गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.‘लोकमत’नेही याप्रकरणी वेळोवेळी विविधांगी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाला चौकशी करण्यास बाध्य केले. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दखल घेऊन पाच अधिकाºयांचे स्वतंत्र पथक नेमले व चौकशीस सुरूवात केली.साधारणत: महिनाभरापासून सुरू असलेल्या चौकशीत वाघळूद, मुठ्ठा आणि वाकद या तीनही गावांमध्ये झालेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये सुमारे ७७ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे तद्वतच बँकांमध्ये मजूरांचे बोगस खाते काढून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले असून ९ बँकांमध्ये काढण्यात आलेले अनधिकृत १२४ खाते सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. संगणमतातून झालेल्या या भ्रष्टाचारप्रकरणी वाघळूदच्या सरपंचासह रोजगार सेवक, सचिव आणि नऊही बँकांच्या व्यवस्थापकांची चौकशी सुरू असून लवकरच धडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी ‘लोकमत’ला दिली.

वाघळूदसह मुठ्ठा आणि वाकद या तीनही गावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. प्रशासनाकडून मात्र थातूरमातूर चौकशी केली जात असल्याने दोषींवर कारवाई करायलाही विलंब होत आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा एकवेळ तक्रार सादर करून चौकशी गतीने करण्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करून भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करण्याची मागणी केली जाणार आहे. मागणीची दखल न घेतल्यास गावकरी तीव्र स्वरूपात आंदोलन करतील.- भागवत अंभोरे, तक्रारकर्ते, वाघळूद

रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार करणाºयांची सखोल चौकशी केली जात आहे. प्राथमिक टप्प्यात ७७ लाखांचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले असून बोगस बँक खाते सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. लवकरच दोषींवरही प्रत्यक्ष कारवाई होईल.- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजनाbankबँक