शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्णाचा पत्नीसह इतर चौघांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 12:39 IST

Mentally ill person attacked his wife बालाजी उत्तम मापारी असे नाव असलेल्या या मनोरुग्णास पोलिसांनी जेरबंद करून त्याची नागपूरच्या रुग्णालयाकडे रवानगी केली. 

 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यातील अनसिंग पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बोरी बु. येथे १८ फेब्रुवारी रोजी ४० वर्षीय मनोरुग्ण इसमाचे मानसिक संतुलन बिघडल्यानंतर त्याने प्रथम स्वत:च्या पत्नीवर विळ्याने हल्ला केला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्यानंतर त्याने गावातील इतर चौघांवरही हल्ला करून त्यांना जखमी केले. बालाजी उत्तम मापारी असे नाव असलेल्या या मनोरुग्णास पोलिसांनी जेरबंद करून त्याची नागपूरच्या रुग्णालयाकडे रवानगी केली. प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ५ वाजता बालाजी मापारी (वय ४० वर्षे) यांचे मानसिक संतुलन बिघडले. त्यांनी चक्क हातात विळा घेऊन पत्नी कांचन मापारी यांना मारहाण केली. त्यात कांचन जखमी झाल्या. त्यानंतर, गावातीलच राजरत्न कांबळे हा शेतातून घरी परत येत असताना त्याला बालाजीने मारहाण केली. यासह पांडुरंग मापारी यास शेतात जाऊन मारहाण केली. संतोष मापारी आणि रमेश मापारी या दोघांनाही बालाजी मापारीने मारहाण करून जखमी केले. गावचे पोलीस पाटील विश्वनाथ मापारी यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर, पोलिसांनी गावात येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले व बालाजी मापारीला ताब्यात घेऊन त्याची नागपूर येथील मानसिक रुग्णालयाकडे रवानगी केली.  गावात दहशत अन् पोलिसांनाही मारहाणमानसिक संतुलन बिघडलेल्या बालाजी मापारी यांनी बोरी बु. येथे १८ जानेवारी रोजी अक्षरश: धुमाकूळ घातला. मिळेल त्याला मारहाण करण्याच्या प्रकारामुळे गावात दहशत निर्माण झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर गावकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, यावेळी बालाजी मापारी यांनी पोलीस पथकातील दोघांनाही मारहाण केली. या प्रकाराची गाव परिसरात जोरदार चर्चा होती.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी