शिवजयंतीनिमित्त मालेगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:19 IST2021-02-21T05:19:16+5:302021-02-21T05:19:16+5:30

या शिबिराचे उद्घाटन नगरपंचायतचे मुख्याधिकारी विकास खंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मालेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार आधारसिंग सोनोने, अरुण ...

Massive blood donation camp at Malegaon on the occasion of Shiva Jayanti | शिवजयंतीनिमित्त मालेगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

शिवजयंतीनिमित्त मालेगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

या शिबिराचे उद्घाटन नगरपंचायतचे मुख्याधिकारी विकास खंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मालेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार आधारसिंग सोनोने, अरुण बळी, प्राचार्य वसंतराव अवचार, प्रा. भरत आव्हाळे, प्रवीण पाटील, श्रीराम अवचार, प्रा. योगेश्वर निकस, अनंत गायकवाड, नागेश कव्हर, मनोज वाझुळकर, जगनाथ रंजवे, प्रा. आनंदा देवळे, जगदीश भालेराव, भागवत मापारी, अनिल वाघ, पप्पू पाटील कुटे, अभी घुगे, आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. दिगांबर निरगुडे, जीवन वानखडे, किसन गोटे, सुरेश बन्सोड व प्रीती शेटे यांनी या शिबिरात रक्तसंकलन करण्यासाठी मोलाची मदत केली. यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच मालेगाव शहर, तालुक्यातील रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.

Web Title: Massive blood donation camp at Malegaon on the occasion of Shiva Jayanti