आजपासून चार दिवस बाजार समिती बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:50 IST2021-09-10T04:50:31+5:302021-09-10T04:50:31+5:30

००००० प्लास्टिक बंदी नियमाचे उल्लंघन वाशिम : शहरातील काही प्रमुख भागांत प्लास्टिक पिशवी बंदी नियमाचे उल्लंघन केले जात आहे. ...

Market committee closed for four days from today | आजपासून चार दिवस बाजार समिती बंद

आजपासून चार दिवस बाजार समिती बंद

०००००

प्लास्टिक बंदी नियमाचे उल्लंघन

वाशिम : शहरातील काही प्रमुख भागांत प्लास्टिक पिशवी बंदी नियमाचे उल्लंघन केले जात आहे. काही दुकानांमधून व भाजीपाला विक्रेत्यांकडून सर्रास ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या दिल्या जातात.

००००

मास्क न वापरल्याबद्दल दंड!

वाशिम : मास्कचा वापर न केल्याबद्दल वाशिम येथे वाहतूक शाखेच्या चमूने मंगळवारी जवळपास १४ जणांवर दंडात्मक कारवाई केली. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, ट्रिपल सीट वाहन चालवू नये, नियमांचे पालन करावे; अन्यथा यापुढेही कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे.

००००००००

ग्रामीण भागात धूरमुक्त अभियानाला खीळ

वाशिम : एलपीजी गॅस-सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढच होत आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस मिळालेल्या बहुतांश महिलांनी दरवाढीमुळे गॅसचा वापर बंद करत पुन्हा चुली पेटविल्या आहेत. त्यामुळे धूरमुक्त अभियानाला खीळ बसत आहे.

०००००

प्रकल्प दुरूस्तीसाठी निधीची प्रतीक्षा

वाशिम : मालेगाव तालुक्यातील जवळपास १४ लघु प्रकल्पाच्या १८ ते २४ गेटची दुरावस्था झाली आहे. या प्रकल्प दुरूस्तीसाठी शासनाकडून अद्याप निधी मिळाला नाही.

०००००

घरकुल लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

वाशिम : शासनाच्या रमाई आवास योजनेंतर्गत वाशिम तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले, बांधकामही सुरू झाले; परंतु या लाभार्थींच्या खात्यात अनुदानाचा पहिला हप्ताच जमा झाला नाही.

००००००००००००

ग्रामीण भागांत रस्त्यावर उकिरडे

वाशिम: रिसोड तालुक्यातील ग्रामीण परिसरात रस्त्यावरच उकिरडे तयार झाले आहेत. या उकिरड्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.

०००००

वाढीव दर कमी करण्याची मागणी

वाशिम : गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलासह अन्य स्वरूपातील किराणा साहित्याचे दर वाढले आहेत. यामुळे गृहिणींचे बजेट बिघडल्याचा सूर उमटत आहे. दर कमी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Market committee closed for four days from today