आरोग्य अधिकारी कार्यालयाला ठोकले कुलूप

By Admin | Updated: May 11, 2016 02:36 IST2016-05-11T02:36:09+5:302016-05-11T02:36:09+5:30

मालेगाव येथील घटना; ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड.

Locked to the Health Officer's office | आरोग्य अधिकारी कार्यालयाला ठोकले कुलूप

आरोग्य अधिकारी कार्यालयाला ठोकले कुलूप

मालेगाव (जि.वाशिम): ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची होत असलेली हेळसांड आणि तालुका आरोग्य अधिकार्‍यांच्या कार्यालयातील नगण्य उपस्थितीमुळे संतप्त झालेल्या भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी मंगळवारी तालुका आरोग्य अधिकार्‍याच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. गेल्या कित्येक दिवसांपासून येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना आरोग्य सेवा व योग्यप्रकारे लसी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारीहून भाजपा तालुका अध्यक्ष तानाजी पवार यांनी मंगळवारी ग्रामीण रुग्णालय गाठले असता, त्यांना रुग्णालयात रुग्णांची गैरसोय असल्याचे दिसून आले. या प्रकाराबद्दल येथील वैद्यकीय अधिकार्‍यांना विचारले असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. पवार यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बोरसे यांचे कार्यालय गाठले. या कार्यालयात सातपैकी एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे पाहून पदाधिकार्‍यांचा पारा आणखीनच चढला. डॉ. बोरसे यांना मोबाईलव्दारे संपर्क केला असता सुरूवातीला त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकार्‍यांनी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकले.

Web Title: Locked to the Health Officer's office