शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या आखाड्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

By admin | Updated: October 3, 2014 00:36 IST

रिसोड मतदारसंघातील चित्र.

विवेकानंद ठाकरे / रिसोड(वाशिम)जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या रिसोड मतदारसंघात आगामी १५ ऑक्टोबरला होऊ घातलेली विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. मतविभाजनाचा फॅक्टर निकाल प्रभावित करणार असला तरी, सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची येथे प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे दिसून येत आहे.खासदार भावनाताई गवळी, माजी खासदार अनंतराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री दिवंगत सुभाषराव झनक आदी दिग्गजांच्या भोवती आजवर जिल्ह्याचे राजकारण फिरत आले आहे. रिसोड मतदारसंघ या तिन्ही दिग्गजांची जन्मभूमी व कर्मभूमी राहिलेला आहे. त्यामुळेच या मतदारसंघाला जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखले जाते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील इतर मतदारसंघांप्रमाणेच या मतदारसंघातील राजकारणाने वेगळीच कलाटणी घेतली आहे. गत २५ वर्षांपासून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या राजकारणात वावरणार्‍या भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती तुटल्याने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यावेळी इरेस पेटले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबतही नेमकी तशीच परिस्थिती झाली. आघाडीत बिघाडी झाल्यामुळे दोन्ही पक्ष परस्परांसमोर उभे ठाकले. निवडणुकीच्या सध्याच्या चित्रानुसार ही निवडणूक अतिशय रंगतदार ठरणार आहे. या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार अमित सुभाषराव झनक दुसर्‍यांदा नशीब आजमावत आहे. भाजपच्या अँड. विजयराव जाधव यांनी पाचव्यांदा रिंगणात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बाबाराव खडसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. पहिल्यांदाच या मतदारसंघातून दंड थोपटणार्‍या शिवसेनेने जिल्हा परिषदेचे सदस्य विश्‍वनाथ सानप यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे निवडणूक रणसंग्रामामध्ये आहेत व भारिपतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड पहिल्यांदाच निवडणुकीत उभे आहेत. रिसोड विधानसभा निवडणुकीत दिग्गज उमेदवार रिंगणात असल्यामुळे लढत ही काट्याची ठरणार आहे.