‘सडक सुरक्षा व जीवन सुरक्षा’ अभियानाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:39 IST2021-01-20T04:39:43+5:302021-01-20T04:39:43+5:30

कार्यक्रमाचे अध्यक्ष रिसोड आगार व्यवस्थापक श्रीकांत जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून रिसोड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा प्राचार्य ...

Launch of ‘Road Safety and Life Safety’ campaign | ‘सडक सुरक्षा व जीवन सुरक्षा’ अभियानाला सुरुवात

‘सडक सुरक्षा व जीवन सुरक्षा’ अभियानाला सुरुवात

कार्यक्रमाचे अध्यक्ष रिसोड आगार व्यवस्थापक श्रीकांत जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून रिसोड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा प्राचार्य साहेबराव जाधव, वाहन निरीक्षक प्रशांत इंगोले, सहाय्यक वाहन निरीक्षक रमेश सावंत, सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक अशोकराव देशमुख हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोकराव देशमुख यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य साहेबराव जाधव यांनी रिसोड आगारामधील चालक, वाहक तसेच तांत्रिक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी यांना सडक सुरक्षा व जीवन सुरक्षा अभियानाचा उद्देश व महत्व आपल्या खास शैलीत पटवून सांगितले. श्रीकांत जगताप आगारप्रमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सडक सुरक्षा तसेच वाहन चालवितांना घ्यावयाच्या काळजीबाबत आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आगारातील वाहन नियंत्रक जायभाये, पांडे. यांत्रिक कर्मचारी उकंडे तसेच बहुसंख्य चालक वाहक व यांत्रिक कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक उदय मोरे तर आभार प्रदर्शन राहुल यांनी केले.

Web Title: Launch of ‘Road Safety and Life Safety’ campaign