कारंजातील हेडांना नेदरलँडच्या विद्यापीठाचे निमंत्रण

By Admin | Updated: September 21, 2015 00:04 IST2015-09-21T00:04:03+5:302015-09-21T00:04:03+5:30

नैसर्गिक संसांधनाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील २0 व्यक्तींचा समावेश.

Invitation to University of the Princeton Head of the Netherlands | कारंजातील हेडांना नेदरलँडच्या विद्यापीठाचे निमंत्रण

कारंजातील हेडांना नेदरलँडच्या विद्यापीठाचे निमंत्रण

कारंजा लाड (जि. वाशिम): कारंजा येथील निसर्ग अभ्यासक तथा संवर्धन संस्थेचे डॉ. निलेश हेडा यांना नैसर्गिक संसाधनांच्या अभ्यासाबाबत डच सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निमंत्रणाने नेदरलँड मधील वेजनिंजन विद्यापीठात २0 दिवसाच्या अभ्यासाठी जात आहेत. या दौर्‍यात विदर्भातील नैसर्गिक संसाधनांची स्थिती ते विद्यापीठांत मांडणार आहेत. दिवसेंदिवस नष्ट होणार्‍या नद्या आणि त्यातील जीवसृष्टी हा जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी जगभरात मंथन सुरू आहे आणि नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनाबद्दल नवनविन पद्धती सुद्धा विकसित केल्या जात आहेत. शेती आणि निसर्गाच्या सर्वच पैलूंचा अभ्यास करणारे व्हेजनिंजन विद्यापीठ हे जगातील काही नामांकित विद्यापीठापैकी एक आहे. या विद्यापीठातील ह्यसेंटर फॉर डेव्हलपमेंट इनिवेशनह्ण हा विभाग जगातील निवडक २0 लोकांना अधिक अभ्यासासाठी संधी उपलब्ध करून देत असतो. या अभ्यासासाठी यावेळी कारंजातील डॉ. निलेश हेडा यांना व्हेजनिंजन विद्यापीठाचे निमंत्रण मिळाले आहे. २0 सप्टेंबर ते १0 ऑक्टोबर या दरम्यान चालणार्‍या या अभ्यास कार्यशाळेचा झांबीया, भुतान, इजिप्त, इथियोपीया, घाणा, इंडोनेशिया, केनिया, म्यानमार, नायजेरिया, तांझानिया, थायलंड, ट्यूनिशिया इत्यादी देशातून अभ्यासक उपस्थित राहणार आहे. या अभ्यास दौर्‍याच्या निमित्ताने आपल्या कडील नैसर्गिक संसाधनांची परिस्थिती जगातल्या नामवंत विद्यापीठात मांडल्या जाणार आहे. डॉ. हेडा शनिवारी मुंबई मार्गे पॅरिस वरून नेदरलँडची राजधानी अँमस्टरडॅमसाठी रवाना झाले आहेत.

Web Title: Invitation to University of the Princeton Head of the Netherlands