कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावरील तालुक्यात आढळत आहेत बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST2021-09-04T04:49:42+5:302021-09-04T04:49:42+5:30

------------ धरणावर वाढली झुडपे वाशिम : जिल्ह्यातील बहुतांश धरणाच्या भिंतीवर मोठमोठी वृक्ष वाढली असून, मूळ खोलवर जाऊन धरणाच्या भिंतीला ...

Infected are found in talukas on the threshold of coronation | कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावरील तालुक्यात आढळत आहेत बाधित

कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावरील तालुक्यात आढळत आहेत बाधित

------------

धरणावर वाढली झुडपे

वाशिम : जिल्ह्यातील बहुतांश धरणाच्या भिंतीवर मोठमोठी वृक्ष वाढली असून, मूळ खोलवर जाऊन धरणाच्या भिंतीला धोका उद्भवण्याची भीती आहे. त्यामुळे ही झुडपे तोडण्याची मागणी होत आहे. जि.प. जलसंधारण आणि पाटबंधारे विभाग मात्र याकडे लक्ष देत नसल्याने, शेतकऱ्यांत नाराजीचे वातावरण आहे.

^^^^^

सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी

वाशिम: सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, म्हणून तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागांत अनेक रुग्णांची तपासणी शुक्रवारी करण्यात आली.

----------------

स्वच्छतेबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन

वाशिम: तालुक्यातील ग्रामीण भागांत रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने गावात घाण वाढत आहे, अशात साथीचे रोगही पसरू लागले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या पृष्ठभूमीवर सरपंचांच्या मार्गदर्शनात ग्रामसचिवांनी सभा घेऊन स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन केले.

Web Title: Infected are found in talukas on the threshold of coronation