शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अडाण प्रकल्पाच्या साठ्यात वाढ; पाचही दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:50 IST

इंझोरी : गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पांच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यात जिल्ह्यातील सर्वात मोठा ...

इंझोरी : गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पांच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यात जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या अडाण प्रकल्पात अचानक जलसाठा वाढल्याने लघु पाटबंधारे विभागाने हा जलसाठा नियंत्रित करण्याची धडपड सुरू केली आहे. यात गेल्या दोन दिवसांपासून धरणाचे पाचही दरवाजे प्रत्येकी २० सेंटिमीटरने उघडण्यात आले आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सर्वच नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात तीन मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्प गत महिन्यातच शंभर टक्के भरल्याने या प्रकल्पाच्या सांडव्याहून पाण्याचा विसर्ग होत आहे, तर गत तीन दिवसांतील पावसामुळे मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पही ओव्हर फ्लो झाल्याने सांडव्याहून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तीन मध्यम प्रकल्पांपैकी सर्वात मोठा असलेल्या अडाण प्रकल्पांतही मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढल्याने धोक्याची घंटा वाजली होती. या पृष्ठभूमीवर यवतमाळ पाटबंधारे विभागाने या प्रकल्पाचे पाचही दरवाजे उघडले आहेत.

------

प्रती सेकंद ११८ घनमीटर पाण्याचा विसर्ग

अडाण प्रकल्प कारंजा तालुक्यातील असून, या प्रकल्पाचे नियंत्रण यवतमाळ पाटबंधारे विभागाकडून केले जाते. या प्रकल्पाची लांबी ७५५ मी (२,४७७ फूट), तर उंची ३०.१३ मी (९८.९ फूट) आहे. या प्रकल्पात संदर्भीय जलसाठ्याच्या पातळीपर्यंत पाणी पोहोचल्याने साठा नियंत्रित करण्यासाठी पाचही दरवाजे दोन दिवसांपूर्वी उघडण्यात आले. या पाच दरवाजांतून प्रती सेकंद ११८ घनमीटर पाण्याचा विसर्ग होत आहे.

----------------

अडाण नदी दुथडीवरच

अडाण प्रकल्प हा अडाण नदीवर उभारण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अडाण नदीला पूर आला असून, अद्यापही ही नदी दुथडी भरून वाहत असल्याने प्रकल्पातील जलसाठा नियंत्रित करावा लागत आहे. त्यामुळेच या प्रकल्पाचे पाचही दरवाजे तीन दिवसांपूर्वी उघडण्यात आले होते, अशी माहिती लघु पाटबंधारे विभाग यवतमाळकडून देण्यात आली.