शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्या बंदमुळे शेतकऱ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST

००००००००००० रोजगार सेवकांना विमा संरक्षणच नाही वाशिम : रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांवर कार्यरत मजूर, रोजगार सेवक यांना विमा ...

०००००००००००

रोजगार सेवकांना विमा संरक्षणच नाही

वाशिम : रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांवर कार्यरत मजूर, रोजगार सेवक यांना विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी संघटनेने वारंवार राज्य शासनाकडे केली आहे. अद्याप विमा संरक्षण देण्यात आले नाही. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी रोजगार सेवक संघटनेने शनिवारी केली.

०००००००००००

ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा केव्हा मिळणार?

वशिम : शिरपूर जैन येथील आरोग्यवर्धिनी केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी करणारा ठराव मालेगाव पंचायत समितीच्या मासिक सभेत यापूर्वीच मंजूर झाला. मात्र, यावर अद्याप ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा केव्हा मिळणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

०००००००००००००००००

लाभार्थींना घरकुल अनुदान वितरण

वाशिम : उपलब्ध निधीनुसार जिल्ह्यातील घरकुल लाभार्थींना अनुदान वितरण केले जात असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डाॅ. विनोद वानखेडे यांनी सांगितले.

००००००००

रेतीघाटाचा लिलाव करण्याची मागणी

वाशिम : गत चार वर्षांपासून रेतीघाटाचे लिलाव बंद असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. रेतीघाटाचे लिलाव करण्याची मागणी संतोष सरकटे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.

००००००००००

आयुडीपी कॉलनीत पथदिवे बंद

वाशिम : नवीन आययुडीपी कॉलनीतील काही पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी या भागात अंधाराचे साम्राज्य असते. नगर परिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी तेजराव वानखेडे यांनी शनिवारी केली.

०००००

शौचालयाचा वापर करण्याकडे दुर्लक्ष

वाशिम : केनवड परिसरात स्वच्छ भारत मिशनअंतर्गत अनेकांना शौचालय उभारून देण्यात आले; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून उघड्यावर घाण करण्याचा प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

००००

संपर्कातील व्यक्तींची चाचणी

वाशिम : वनोजा येथे शनिवारी एक जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. कोरोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तींच्या माहितीचे संकलन आणि कोरोना चाचणी

केली जाणार आहे.