शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा!

By admin | Updated: August 31, 2016 02:09 IST

‘दिशा’ समितीची आढावा बैठकीत खासदार भावना गवळी यांनी योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना.

वाशिम, दि. ३0 : ग्रामीण भागात राहणार्‍या जनतेच्या विकासासाठी राबविण्यात येत असणार्‍या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना खासदार तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या अध्यक्ष भावना गवळी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा)च्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह मानोरा पंचायत समितीच्या सभापती धनश्री रोठोड, कारंजा पंचायत समिती सभापती वर्षा नेमाने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक के. एम. अहमद, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नसिरुद्दीन पटेल यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.खासदार गवळी म्हणाल्या की, जिल्ह्यात सुरु असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामांवरील मजुरांना वेळेत मजुरी दिली जावी. मजुरी अदा करण्यास विलंब झाल्यास संबंधित अधिकार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. सन २0१३ मध्ये अतवृष्टीमुळे खचलेल्या सिंचन विहिरींची दुरुस्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही खासदार गवळी यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधील अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व तहसीलदार व गट विकास अधिकार्‍यांनी नियोजनपूर्वक प्रयत्न करावे. काही तालुक्यांमध्ये पेंडींग मस्टर्सचा प्रश्न उद्भवला आहे. याप्रकरणी संबंधित गट विकास अधिकारी व तहसीलदार यांनी समन्वयाने काम करून तातडीने पेंडींग मस्टर्सचा विषय निकाली काढावा.यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, इंदिरा आवास योजना यासह इतर योजनांचा आढावा घेण्यात आला.