शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर शहरातील निराधार चिमुकल्या मुलींना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:45 IST

काही दिवसांपूर्वी दोन चिमुकल्या मुलींना मदतीचा हात हवा असल्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते यांनी सोशल मीडियातून केले होते. प्रसारमाध्यमांनीही दखल ...

काही दिवसांपूर्वी दोन चिमुकल्या मुलींना मदतीचा हात हवा असल्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते यांनी सोशल मीडियातून केले होते. प्रसारमाध्यमांनीही दखल घेऊन सेवाभावींनी वडिलांचे छत्र आणि आईच्या मायेची सावली नसलेल्या अशोकनगर वस्तीतील त्या मुलींना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर काही सेवाभावींनी मदतही केली. चिमुकल्या मुलींना मदतीची गरज असल्याचे कळताच, कारंजा येथील रहिवासी असलेले बिरसा क्रांती दल वाशिमचे राजेश मस्के हे गहू घेऊन थेट मंगरुळपीरला त्या कुटुंबीयांना देण्यासाठी पोहोचले, तसेच आपले सहकारी असलेल्या शिक्षकमित्रांनीही त्या कुटुंबीयांची भेट घेण्याविषयी चर्चा केली. लगेच सहकाऱ्यांच्या हाकेला ओ देत मंगरुळपीरचे गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनीही हजेरी लावून त्या मुलींची आस्थेने विचारपूस केली आणि रोख मदतही केली.

यावेळी केंद्रप्रमुख, जि. प. सदस्य चिंतामण खुळे, सुदाम भोडने, जीवन हगवणे, जामदरा येथील कैलास ढोके, इरफान शेख, धम्मा कांबळे, राजेश मस्के आदींची उपस्थिती होती. ००००००००००००

आठवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय

अशोकनगर येथील डाके कुटुंबातील चिमुकल्या मुलींना केवळ आर्थिक मदतच दानशूरांनी केली नाही, तर आठवीपर्यंत त्या मुलींच्या मोफत शिक्षणाची सोय लावून शैक्षणिक साहित्यही पुरविण्याचा संकल्प गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने यांच्यासह इतर शिक्षकांनी केला आहे. तसेच सर्व शिक्षकांनी या चिमुकल्या मुलींना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही केले.

Template

Image Attachment

Photo Manager

Social Media

Metadata

Attach Document

Translate

Backup

Agency

QrCode

Attch Audio/Video

Words : 1

Characters : 0