आरोग्य केंद्र रामभरोसे

By Admin | Updated: September 28, 2014 00:08 IST2014-09-27T23:55:27+5:302014-09-28T00:08:16+5:30

मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-याचे पद रिक्त.

Health Center Ram Bharos | आरोग्य केंद्र रामभरोसे

आरोग्य केंद्र रामभरोसे

मोहरी: मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍याचे पद रिक्त असून, आरोग्य कर्मचार्‍यांच्या मनमानी कारभाराने कळस गाठल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.
मोहरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक दिवसांपासून वैद्यकीय अधिकारीच नाही. त्यामुळे रु ग्णांवर व्यवस्थित उपचार होऊ शकत नाहीत. सद्यस्थितीत मोहरी परिसरात तापाची साथ असून, या आजारावर उपचारासाठी प्रा.आ. केंद्रात येणारे रुग्ण डॉक्टरच नसल्यामुळे उपचाराविनाच परत जात आहृेत. गत १0 सप्टेंबरला जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती राजेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच गणेश देशमुख आणि डॉ. प्रदीप नव्हाते यांच्या यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी मुख्यालयी राहावे आणि त्यांना ते शक्य नसेल, तर आपल्या सोयीने इतर ठिकाणी बदली करून घ्यावी, अशी मागणी उपसरपंच आणि तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांकडून करण्यात आली. त्यावेळी १५ दिवस मुख्यालयी राहण्याची ग्वाही दिली; परंतु त्यांच्याकडून दिलेला शब्द पाळण्यात आला नाही. अद्यापही या कर्मचार्‍यांचे अपडाऊन सुरूच असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. प्रा.आ. केंद्राच्या परिसरात गाजर गवत मोठय़ा पसरले आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, रुग्णांचा आजार बरा होण्याऐवजी ताग अधिकच वाढण्याची शक्यता आहे. या प्रकाराकडे आरोग्य विभाग आणि संबंधित जनप्रतिनिधींनी जातीने लक्ष घालून डॉक्टरांची नियुक्ती क रावी आणि रुग्णांची ेगैरसोय टाळावी, अशी मागणी उपसरपंच किशोर म्हातारमारे आणि तंटामुक्ती अध्यक्ष एस. पी. मिसाळ यांनी केली आहे.

Web Title: Health Center Ram Bharos