फवारणीतील विषबाधेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST2021-09-07T04:50:45+5:302021-09-07T04:50:45+5:30

शनिवार ४ सप्टेंबर रोजी तालुक्यातील वाकद येथे कृषी सहायक इरेश कचलवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना फवारणी करताना घ्यावयाच्या ...

Guidance to farmers on spray poisoning | फवारणीतील विषबाधेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

फवारणीतील विषबाधेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शनिवार ४ सप्टेंबर रोजी तालुक्यातील वाकद येथे कृषी सहायक इरेश कचलवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. फवारणी करीत असताना शेतकऱ्यांनी हातात हात मोजे घालून फवारणी करावी तसेच डोळ्याच्या संरक्षणार्थ चष्मा घालून अंगावर वस्त्र व पायामध्ये बूट वापरावा, शेतकऱ्यांनी तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नये, हवेच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये, तसेच चेहऱ्यावर मास्क लावून फवारणी करावी, पिकावर फवारणी करताना सर्व प्रकारची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन कृषी सहायक इरेश कचलवार यांनी केले आहे. यावेळी वाकद शेत शिवारातील शेतकरी शिवलाल बिजोरे, दामोदर गरड, अस्तरकर महाराज, गणेश म्हसवडकर, प्रल्हाद घुगे आदी शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

060921\img_20210906_164738.jpg

रिसोड तालुक्यातील वाकद शेतशिवारात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना कृषी सहायक इरेश कचकलवार

Web Title: Guidance to farmers on spray poisoning