शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST

कोरोनामुळे अनेक कारणांनी ताणतणाव, कलह वाढले आहेत. रोजगार गेल्याने कौटुंबिक कलह तर काही ठिकाणी नोकरी असुरक्षित असल्याची भावनाही ताणतणावास ...

कोरोनामुळे अनेक कारणांनी ताणतणाव, कलह वाढले आहेत. रोजगार गेल्याने कौटुंबिक कलह तर काही ठिकाणी नोकरी असुरक्षित असल्याची भावनाही ताणतणावास कारणीभूत ठरते. इतरही काही कारणांनी आलेले नैराश्य, नकारात्मक भावना आणि त्यासोबतच अव्यक्त होण्याचे प्रकार वाढत आहेत. परिणामी, घराघरांत संवाद अत्यल्प होत असून, अनेक जण मानसिक तणावाखाली वावरत असल्याचे समोर येत आहे. कामाचा ताण, घराचे हप्ते, हाती पैसे नसणे यामुळे कुटुंबाचे कसे होणार? जबाबदाऱ्या कशा पूर्ण होणार? याचा मनावर ताण असतो. योग्यवेळी योग्य व्यक्तीकडे याबाबत व्यक्त न झाल्यास समस्या वाढतात. या समस्या टाळण्यासाठी व्यक्त व्हा, मोकळे व्हा, बोलते व्हा. जवळच्या व्यक्तीसोबत संवाद वाढवा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला.

०००००

मन हलके करणे हाच उपाय

नकारात्मक काढून सकारात्मक विचार करणे.

नियमित व्यायाम, योग व प्राणायाम करणे.

कुटुंबातील सदस्यांसोबत एकत्र जेवण करणे, एकत्र वेळ घालविणे.

रागावर नियंत्रण मिळविणे.

जवळच्या व्यक्तीजवळ व्यक्त होणे.

सकस आहार घेणे.

पुरेशी झोप घेणे.

चिडचिड न करणे.

...................

कोरोनामुळे अनेकांमध्ये मानसिक ताणतणाव दिसून येतो. मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी संवाद वाढविणे आवश्यक आहे. निकटर्तीय, मित्र, कुटुंबीय यांच्याजवळ आपले विचार, भावना व्यक्त केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते.

- डॉ. रवींद्र अवचार

मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम

................

मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी सदैव चिंतामुक्त राहणे आवश्यक आहे. एखाद्या विषयाचा ताण असेल तर त्याबाबत जवळच्या व्यक्तीशी, कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला पाहिजे. संवादातून मार्ग निघतो.

- डॉ. मंगेश राठोड,

मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम.