शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

गणपती बाप्पांना आज निरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:20 IST

वाशिम: २५ ऑगस्टपासून जिल्हय़ात मुक्कामी असलेल्या गणरायांना ५ सप्टेंबरपासून भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. ५ ते ७ सप्टेंबर असे तीन दिवस टप्प्याटप्याने जिल्हय़ात श्री गणेश मूर्तींंचे विसर्जन होणार आहे.  

ठळक मुद्देप्रमुख मार्गांंवर ‘सीसी’ची नजरतीन टप्प्यात होणार जिल्हय़ात ‘श्रीं’चे विसर्जनकामरगाव येथे ७ सप्टेंबरला विसर्जन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: २५ ऑगस्टपासून जिल्हय़ात मुक्कामी असलेल्या गणरायांना ५ सप्टेंबरपासून भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. ५ ते ७ सप्टेंबर असे तीन दिवस टप्प्याटप्याने जिल्हय़ात श्री गणेश मूर्तींंचे विसर्जन होणार आहे.  जिल्हय़ात शहर विभागात २४५ तर ग्रामीण विभागात ४४१ असे एकूण ६८६  सार्वजनिक गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. ग्रामीण भागात २१0 गावांमध्ये एक गाव-एक गणपती हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हय़ात पोलिसांवरील ताण कमी व्हावा, कोणतीही अनूचित घटना घडू नये याकरिता ५ सप्टेंबर ते ७ सप्टेंबरपर्यंंत तीन टप्प्यात गणेश मूर्तींंचे विसर्जन करण्यात येणार आहे. ५ सप्टेंबर रोजी वाशिमसह काही ठिकाणी गणेश मूर्तींंचे विसर्जन होणार आहे. ६ सप्टेंबर रोजी मानोरा, मंगरुळपीर तर ७ सप्टेंबर रोजी ग्रामीण भागात कामरगावसह अन्यत्र श्रींचे विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. तर दुसरीकडे गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेशभक्तही सज्ज आहेत. पालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत.

बचाव पथके तैनात, दारू विक्री बंद गणेश विसर्जनादरम्यान दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने बचाव पथके तैनात ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांनी दिली. गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी विसर्जनादरम्यान देशी व विदेशी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

कामरगाव येथे ७ सप्टेंबरला विसर्जनकारंजा लाड: तालुक्यातील कामरगाव येथे ८ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने ‘श्रीं’ची स्थापना करण्यात आली. गणेश मंडळाने शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासंदर्भात ठाणेदार व पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत शांतता समितीच्या दोन बैठका घेण्यात आल्या. कामरगाव येथील गणेश विसर्जन येत्या ७ सप्टेंबर रोजी होत असून, गणेश विसर्जन मिरणुकीवर २६९ पोलिसांच्या ताफ्यासह करडी नजर राहणार आहे. गणेश उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून कलम १४४ नुसार २७ जनांवर व इतर ५ जणांवर तर एका जणांवर तडीपारची कार्यवाही पोलिसांनी केली आहे. विसर्जन मिरवणूक ही कामरगावातील लाकडे पुर्‍यांपासून सुरू होऊन स्मशानभूमीजवळील सार्वजनिक विहिरीत ‘श्रीं’चे विर्जसन होणार आहे. मिरवणुकीदरम्यान गणेश भक्तांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून कुठल्याही अफवेला बळी न पडता शांततेसाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.