मुंगळा येथे गाडगेबाबा जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:57 IST2021-02-26T04:57:12+5:302021-02-26T04:57:12+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे प्रशासक सुनील सोंडकर होते तर सत्कारमूर्ती नवनिर्वाचित सरपंच शुभांगी प्रवीण वायकर, उपसरपंच नंदकिशोर वनस्कर व सदस्य ...

Gadge Baba Jayanti celebration at Mungala | मुंगळा येथे गाडगेबाबा जयंती साजरी

मुंगळा येथे गाडगेबाबा जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे प्रशासक सुनील सोंडकर होते तर सत्कारमूर्ती नवनिर्वाचित सरपंच शुभांगी प्रवीण वायकर, उपसरपंच नंदकिशोर वनस्कर व सदस्य उपस्थित होते.

यावेळी कोरानाचे संकट लक्षात घेता फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून श्री संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच शुभांगी वायकर व उपसरपंच नंदकिशोर वनस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम राऊत, शुभानंद बेलोकर, नीता राऊत, संगीता खुळे, प्रवीण वायकर, माजी उपसरपंच अनंतराव कुटे, प्रल्हाद भांदुर्गे, प्रताप राऊत, दिलीप वायकर, पप्पू राजेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी चौधरी यांनी तर आभार कर्मचारी संजय नखाते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी महादेव पवार, विठ्ठल केळे, भिमराव वानखेडे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Gadge Baba Jayanti celebration at Mungala