गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:42 IST2021-02-24T04:42:15+5:302021-02-24T04:42:15+5:30

सर्वप्रथम गाडगेबाबा नगरमधील नागरिकांनी सकाळी बाबांच्या तैलचित्राच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. सकाळी दहा वाजता राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रतिष्ठित ...

Gadge Baba Jayanti celebrated with enthusiasm | गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

सर्वप्रथम गाडगेबाबा नगरमधील नागरिकांनी सकाळी बाबांच्या तैलचित्राच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. सकाळी दहा वाजता राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रतिष्ठित नागरिक अरुणराव बळी, प्रा. पी. एस. खिराडे व संतोष भालेराव यांनी गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. तर प्रा. खिराडे यांनी गाडगेबाबांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. अरुण बळी यांनी गाडगेबाबा नगरमधील परिसराची नियमित स्वच्छता करण्याचे आवाहन उपस्थितांना आवाहन केले. यावेळी गाडगे नगरमधील संतोष भालेराव, महेंद्र उंबरकर, प्रा. किसन राठोड, दीपक रणबावळे, माणिक मोहळे, नितीन घुगे, योगेश जहीरव, युवराज तिवाले, हेमंत आवचार, गजानन नवले, गोपाल मोरे, गजानन बळी, रितेश जगताप यांच्यासह गाडगेबाबा नगरमधील जवळपास साठ नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष भालेराव यांनी केले. आभार महेंद्र उंबरकर यांनी मानले.

Web Title: Gadge Baba Jayanti celebrated with enthusiasm