शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

उंबर्डाबाजार येथे घराला भीषण आग; माय-लेकींचा होरपळून मृत्यू!  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 10:31 PM

उंबर्डाबाजार येथील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास असलेल्या गणेश मारोटकर यांच्या घराला सोमवार, १४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.

उंबर्डाबाजार : उंबर्डाबाजार येथील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास असलेल्या गणेश मारोटकर यांच्या घराला सोमवार, १४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत माय-लेकींचा होरपळून जागीच मृत्यू झाला; तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी, की ग्राम उंबर्डाबाजार येथील इंदिरानगर झोपडपट्टी भागात  राहणाºया गणेश मारोटकर यांच्या घराला  सोमवारी सायंकाळी अचानक आग लागली. ही आग एवढी भीषण होती, की काही कळण्याच्या आतच आगीने घरात असलेल्या सुमन वसंत मारोटकर (वय ५० वर्षे) आणि पंचफुला  मारोती  गुहाडे (वय ७५ वर्षे) या माय-लेकींचा त्यात अक्षरश: होरपळून मृत्यू झाला; तर वसंत मारोटकर  आणि गणेश मारोटकर हे दोघे बापलेक या आगीत गंभीररित्या भाजून जखमी झाले.   त्यांना उंबर्डाबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात  प्राथमिक  उपचारानंतर  कारंजा  उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. आगीच्या या घटनेत मारोटकर यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य देखील जळून खाक झाले.  घटनास्थळाला कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन गुल्हाने  यांनी भेट दिली. घटनेची वार्ता कळताच कारंजा नगर परिषदेने विनाविलंब अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल केले. मात्र, तोपर्यंत बराच वेळ उलटून गेला होता. गावकºयांनीही आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न केले."गॅस सिलींडर लिकेजमुळे घडली घटनाउंबर्डाबाजार येथे घराला लागलेल्या आगीच्या घटनेबाबत ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आग घरात असलेल्या गॅस-सिलींडरच्या लिकेजमुळे घडल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :fireआगwashimवाशिम