शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाच्या कामाला शेतकऱ्यांचा विरोध

By admin | Updated: May 31, 2017 19:46 IST

शिरपुर जैन : मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवित काम बंद केले असून रस्त्याचे काम चांगले व रुंद करण्याची मागणी ३१ मे रोजी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपुर जैन :  किन्ही घोडमोड मार्गे पर्यायी म्हणून केला जाणारा रस्ता अतिशय अरुंद व तकलादू बनविण्यात येत आहे. यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होवून मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवित काम बंद केले असून रस्त्याचे काम चांगले व रुंद करण्याची मागणी ३१ मे रोजी केली.२००५ -०६ पासून मंजुरात असलेल्या मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाला मागील दोन महिन्यापासून गती मिळाली आहे. सदर काम थंडबस्तयात पडले असतांना लोकमतने पाठपुरावा करुन सदर कामे त्वरित होण्यासाठी पुढाकार घेतला होता. याची दखल अधिकाऱ्यांनी घेवून कामाला गती दिली होती.  सद्यस्थितीत पांगरखेडा ते चांडस गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम जोरात सुरु आहे. मात्र बुडित क्षेत्रात गेलेल्या शिरपूर मिर्झापूर रस्तयाला पर्याय म्हणून किन्ही घोडमोड मार्गे केलेला पर्यायी रस्ता अतिशय अरुंद व तकलादू बनविल्या जात आहे. सदर होत असलेल्या कामाच्या निषेधार्थ ३० मे पासून मिर्झापूर, घाटा वासियांनी प्रकल्पाच्या कामाला विरोध करुन काम बंद ठेवण्याची मागणी केली होती. ३१ मे रोजी सुध्दा सदर कामावर जावून ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त केला आहे. याचप्रमाणे शिरपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतात कॅनॉलचे खोदकाम पाच ते सात वर्षांपासून करण्यात आले, परंतु त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला अद्याप मिहालेला नाही. मोबदला त्वरित देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.