शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या अर्जांसाठी शेतकर्‍यांचे ‘जागरण’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:24 IST

पीक कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर असून, शेवटच्या अवघ्या १0 दिवसांत अर्ज सादर करण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू आहे. मात्र, सदर प्रक्रियेत ‘सर्व्हर डाउन’ची समस्या बळावली असून, प्रत्येकी केंद्रावर दिवसभरात केवळ १0 ते १२ च अर्ज ‘अपलोड’ होत आहेत. विशेष गंभीर बाब म्हणजे हातचे सर्व काम सोडून अर्ज करण्यासाठी येणार्‍या शेतकर्‍यांना तांत्रिक अडचणींमुळे आपले सरकार सेवा केंद्रांवरच जागरण करावे लागत असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्दे‘सर्व्हर डाउन’ची समस्या बळावली अर्ज अपलोड करणे होतेय अशक्य!

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : पीक कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर असून, शेवटच्या अवघ्या १0 दिवसांत अर्ज सादर करण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू आहे. मात्र, सदर प्रक्रियेत ‘सर्व्हर डाउन’ची समस्या बळावली असून, प्रत्येकी केंद्रावर दिवसभरात केवळ १0 ते १२ च अर्ज ‘अपलोड’ होत आहेत. विशेष गंभीर बाब म्हणजे हातचे सर्व काम सोडून अर्ज करण्यासाठी येणार्‍या शेतकर्‍यांना तांत्रिक अडचणींमुळे आपले सरकार सेवा केंद्रांवरच जागरण करावे लागत असल्याचे दिसून येत आहे. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात ३४६ आपले सरकार सेवा केंद्र, १३३ महा ई-सेवा केंद्र आणि ३0९ बायोमेट्रिक यंत्र उपलब्ध करण्यात आले आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागात कर्जमाफीचे अर्ज भरून घेतले जात आहेत. मात्र, नेट कनेक्टिव्हिटी नसणे, सर्व्हर डाउन असणे यासह इतर तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच आधार कार्ड क्रमांक मोबाइल क्रमांकाशी संलग्न (लिंक) असणे गरजेचे आहे; परंतु अनेकजण यापासून अनभिज्ञ असल्याने त्यांना कर्जमाफीचा अर्ज सादर न करताच परतावे लागत असल्याचे पहावयास मिळत आहे. 

ऑनलाइन अर्जात हास्यास्पद प्रश्न!पीक कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जात एका ठिकाणी ‘तुम्हाला कर्जमाफी हवी अथवा नाही’, असा हास्यास्पद प्रश्न विचारण्यात आला आहे. यादरम्यान चुकीने ‘नाही’ या पर्यायावर ‘क्लिक’ झाल्यास पात्र असणारे शेतकरीही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू शकतात. वास्तविक पाहता, आपले सरकार अथवा महा ई-सेवा केंद्रांवर कर्जमाफी मिळावी, यासाठीच शेतकरी जात असताना अर्जामध्ये असा प्रश्न विचारण्याचे नेमके कारण काय, असा सवाल शेतकर्‍यांमधून उपस्थित केला जात आहे.