शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

अमानी केंद्रावर रुजू होण्यास कर्मचार्‍यांची नकारघंटा

By admin | Updated: August 18, 2014 01:45 IST

वाशिम जिल्ह्यातील ३४ पैकी २३ कर्मचारी रुजूच झाले नाहीत.

वाशिम : एकीकडे वाशिमवर कोरड्या दुष्काळाचे संकट घोंगावत आहे, तर दुसरीकडे महामार्ग पोलिस मदत केंद्रावरही कर्मचार्‍यांच्या रिक्त पदांमुळे मदतीचा ह्यदुष्काळह्ण जाणवत आहे. वाशिम ते मालेगाव मार्गावरील अमानीजवळ असलेल्या महामार्ग पोलिस मदत केंद्रावर ३४ पैकी केवळ नवच कर्मचारी तैनात असल्याने २३ कर्मचारी रुजू कधी होणार, हा प्रश्न दीड वर्षांपासून गुलदस्त्यातच आहे.महामार्गावरील बेताल वाहतुकीला तळय़ावर आणण्यासाठी तसेच अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी महामार्ग पोलिस मदत केंद्राची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. वाशिम जिल्ह्यात अमानी येथे महामार्ग पोलिस मदत केंद्र आहे. या केंद्राच्या दिमतीला एक पोलिस उपनिरीक्षक, ३४ कर्मचारी व दोन चालक असा फौजफाटा देण्यात आला आहे. पोलिस कर्मचार्‍यांच्या नियुक्तीचा कालावधी तीन वर्षासाठी निश्‍चित करण्यात आलेला आहे. डिसेंबर २0१२ मध्ये ३२ कर्मचार्‍यांचा तीन वर्षाचा सेवाकाळ संपुष्टात आल्याने मुंबई येथे डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात महामार्गाचे तत्कालीन अतिरिक्त पोलिस महासंचालक विजय कांबळे यांच्या पॅनलने मुलाखत प्रक्रिया राबविली. मुलाखतीमधून अमानी येथे ३२ जणांची निवड करण्यात आली. यामुळे अमानी केंद्रातील रिक्त पदांचा वनवास संपण्याची आशा होती. नियुक्तीच्या पाच महिन्यानंतर नऊ कर्मचारी रुजू झाले होते. एक पोलिस उपनिरीक्षक, नऊ कर्मचारी आणि दोन चालक अशा १२ जणांच्या भरोशावर महामार्गावर ह्यवॉचह्ण ठेवण्याचे अवघड शिवधनुष्य या कर्मचार्‍यांना पेलावे लागत आहे. कर्मचारी नसल्याने पातूर महामार्ग चौकीला कुलूप लागले आहे, तर अमानी केंद्र कसेबसे सुरू आहे. कर्मचारी रुजू का होत नाहीत किंवा त्यांना पूर्वीच्या ठिकाणावरून कार्यमुक्त केले जात नाही, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. वरिष्ठांचे आदेश ह्यप्रमाणह्ण मानून काटेकोरपणे सेवा देणार्‍या पोलिस दलाच्या कर्मचार्‍यांना अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या आदेशाचा विसर पडावा, ही बाब आश्‍चर्यकारक आहे. महामार्गावरील भरधाव वाहतुकीला लगाम घालणे व अपघातग्रस्तांना मदत पोहोचविणे या हेतूने स्थापन झालेले अमानी मदत केंद्रच कर्मचार्‍यांअभावी ह्यनिराधारह्ण बनत चालले आहे.