शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
4
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
5
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
6
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
7
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
9
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
10
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
11
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
12
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
13
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
14
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
15
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
16
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
17
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
18
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
19
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
20
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राची मान शरमेने खाली

By admin | Updated: July 24, 2014 22:56 IST

सेना खासदाराने ‘रोजा’ सोडल्याच्या घटनेबाबत नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया

वाशिम : राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिवसेनेच्या खासदारांनी केलेल्या आघ्य कृत्यामुळे महराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. खासदारांना निकृष्टप्रतिचे अन्न मिळत असल्याची तक्रार करत तेथील एका मुस्लिम कर्मचार्‍याच्या तोंडात बळजबरीने चपाती कोंबून त्याचा रोजा मोडण्याचे निंदनीय कृत्य केले गेले. शिवसेना खासदाराच्या या कृत्याचा समाजाच्या सर्वस्तरातून निषेध व्यक्त होत आहे. या घटनेमुळे सर्वधर्मसमभाव आणि सहिष्णुतेची शिकवण देणार्‍या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे.

** 'आज हे बंद, उद्या ते बंद, आम्ही मुले-मुले आमचा काय संबंध' असं एक बालगीत पूर्वी होतं. आता ते विस्मृतीत गेलं. परंतु छोट्या-छोट्या कारणांवरून वाढणारे ताणतणाव, बंद, मोर्चे, आंदोलने, राडेबाजी या सगळ्या गदारोळात आजचा युवक कसा विचार करतो, याचा धांडोळा शिवसेनेच्या दिल्लीतील आंदोलनाच्या निमित्तानं घेतला असता, त्याच बालगीताची आठवण अनेकांना झाली. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात शिवसेनेनं चांगल्या सुविधांसाठी आंदोलन करताना चक्क रमजानच्या महिन्यात मुस्लिम कर्मचार्‍याला जबरदस्तीनं चपाती खाऊ घातली. हा प्रकार ज्यांनी-ज्यांनी वृत्तवाहिन्यावर पाहिला, वर्तमानपत्रात वाचला; त्यांनी या कृत्याचा मनोमन निषेधही केला. एरवी महाविद्यालयीन युवकांना अशा राजकीय घटनांविषयी फारशी उत्कंठा नसते. करणं त्यांचं विश्‍व आता फार विस्तारलंय आणि त्यात जातीधर्माला अजिबात थारा नाही.पण 'हे विश्‍वची माझं घर' अशा संतवचनाला जागणारा महाराष्ट्र दिल्लीतील त्या घटनेमुळे शरमिंदा झाला. जगाच्या कल्याणासाठी जिथे ज्ञानदेवांनी पसायदान मागितले, त्याच भूमीतील शिवसेनेच्या खासदारांनी महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासला, अशा संतप्त प्रतिक्रिया समाजाच्या सर्वस्तरातून उमटत आहेत. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागले पाहिजे, असा सल्लाही अनेकांनी दिला.