शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूका बहुरंगीच

By admin | Updated: September 28, 2014 00:05 IST

अनेकांना अनपेक्षित उमेदवारी: वाशिम जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलली.

वाशिम : राज्यात आघाडी युतीत आलेली बिघाडी अन त्यानंतर इच्छूक उमेदवारांची अनपेक्षितपणे दाखल झालेली उमेदवारी यामुळे वाशिम जिल्हय़ातील तीनही विधानसभा मतदारसंघातील निवडणुका कुठे पंचरंगी तर कुठे बहुरंगी लढतीकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे.जागा वाटपाच्या मुद्यावरुन भाजप शिवसेनेसह इतर घटक पक्षांच्या महायुतीचा घटस्थापनेला घटस्फोट झाला. त्याला काही क्षणाचा वेळ जातो की नाही तोच १५ वर्षापासून राज्यात आघाडी करुन सत्तेत राहणार्‍या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीतही बिघाडी आली. महायुती व आघाडीतील बिघाडीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, या पक्षानी राज्यातील विधानसभा निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवधीला केवळ ४८ तासाचा अवधी बाकी राहिला असताना घेण्यात आल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आजवर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंंत कायम संभ्रमावस्था राहिली. अर्थात या संभ्रमावस्थेच्या शेवटच्या क्षणापर्यंंत उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या आजवरच्या सर्वच पक्षाकडील अनेक इच्छुक उमेदवारांनी अनपेक्षि तपणे ज्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती त्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल न करता ऐन वेळी दुसर्‍याच पक्षाकडून ए.बी. फॉर्मसह थेट उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विधानसभा निवडणुकीत चांगलीच चुरस होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. आजघडीला निर्माण झालेली राजकीय परिस्थिती पाहता पक्षासाठी काम करणार्‍या अनेक कार्यक र्त्यांंना कोणता झेंडा घेवू हाती च्या परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली असली तरी रिसोड- मालेगाव, वाशिम-मंगरुळपीर व कारंजा-मानोरा या तीनही विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारिप बहुजन महासंघ, बहुजन समाज पार्टी यासह इतर छोट्या मोठय़ा पक्षाच्या वतीने अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने होवू घातलेली विधानसभा निवडणूक जिल्हय़ाच्या राजकीय समिकरणांना कलाटणी देणारी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनपेक्षित दाखल झालेल्या उमेदवार्‍या, अनेक इच्छुकांचे ऐनवेळी उमेदवारी मिळण्याचे भंगलेले स्वप्न व सर्वच राजकीय पक्षांची एकला चलो रे ची हाक यामुळे वाशिम जिल्हय़ातील तीनही विधानसभा निवडणुका कुठे पंचरंगी तर कुठे बहुरंगी होण्याची शक्यता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसानंतर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांंमुळे वर्तविली जात आहे.