शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूकीच्या प्रचारात महिला कार्यकर्त्या आघाडीवर

By admin | Updated: October 5, 2014 01:40 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी

वाशिम : चूल आणि मूल या जोखडातून बाहेर पडत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा राजकारणातील तळागाळातील स्तरावर रोवला आहे. मात्र, विधानसभा आणि लोकसभेच्या स्तरावर झेप घेऊ पाहणार्‍या महिलांना पुरूषी वरचष्मा असलेल्या राजकारणाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच अडकवून ठेवले आहे. राजकीय पक्ष सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी नापास ठरविलेल्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष प्रचारासाठी खात्रीचे नाणे म्हणून वापरताना दिसत आहेत.विशेष बाब म्हणजे प्रचारात महिला या पुरूष कार्यकर्त्यांपेक्षा आघाडीवर आहेत. राजकारणाचा पाया असणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गाव आणि तालुका पातळीवर सर्व अडचणींना सर्मथपणे तोंड देत महिलांनी राजकारण आणि विकासाची सांगड घालत अत्यंत उत्तम कामगिरी बजावली आहे. या कामगिरीच्या बळावर राजकारणात त्यांनी आपले पाय चांगलेच रोवले आहेत. परंतु त्यांच्या वाटा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिकेतच अडविल्या गेल्या आहेत. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभेतील महिलांचा टक्का वाढायला तयार नाही. जिल्ह्यात एकूण आठ लाख ७४ हजार ६८८ मतदार आहेत. त्यांपैकी चार लाख ३६ हजार १३५ मतदार हे पुरुष आहेत, तर तब्बल चार लाख ११ हजार ३५७ मतदार महिला आहेत. हा आकडा पाहिल्यास सुमारे ४५ टक्क्यांहून अधिक मतदार महिला आहेत. ही बाब लक्षात घेऊन या व्होट बँकेला आपल्याकडे ओढून घेण्यासाठी राजकीय पक्षांना महिला कार्यकर्त्यांची फळी हवी आहे. प्रचारात महिलांची ही फळी उभी करण्यासाठी राजकीय पक्षांनी महिला आघाड्यांची स्थापना करणे, महिला बचतगटांची उभारणी करणे, याशिवाय प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी कार्यकर्त्या महिलांची मोठी फळी उभी करण्याचे काम केले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यातील वाशिम, कारंजाव रिसोड या मतदारसंघात तेच चित्र दिसून येत आहे.