माहिती अधिकारात माहिती न मिळाल्याने इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Updated: October 1, 2015 01:03 IST2015-10-01T01:03:11+5:302015-10-01T01:03:11+5:30

वाशिम येथील घटना; बाल विकास प्रकल्प अधिका-याकडे मागीतली होती माहिती.

Due to lack of information in the information authority, she tried her suicide | माहिती अधिकारात माहिती न मिळाल्याने इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न

माहिती अधिकारात माहिती न मिळाल्याने इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न

वाशिम : येथील बाल विकास प्रकल्प अधिकार्‍यांकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता, विलंब केल्याच्या कारणावरून ३८ वर्षीय इसमाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ३0 सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताचे सुमारास घडली.
मंगरूळपीर येथील रहिवासी जमील अहमद मुख्तार अहमद सौदागर यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी व नागरी प्रकल्प कार्यालयामध्ये माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. मागितलेली माहिती देण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने सौदागर यांनी ३0 सप्टेंबर रोजी दुपारी कार्यालय परिसरात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची वाशिम शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी जमील अहमद मुख्तार अहमद सौदागर यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३0९ अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Due to lack of information in the information authority, she tried her suicide