शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अपु-या नोंदीमुळे सावकारी कर्जमुक्ती वांध्यात!

By admin | Updated: December 25, 2015 03:03 IST

कारंजा तालुक्यात पडताळणीदरम्यान तलाठय़ांच्या अपूर्ण नोंदी निदर्शनात येत असल्याने पात्र शेतकरी सावकारी कर्जमुक्तीपासून वंचित राहण्याची भीती.

वाशिम: राज्य सरकारने सावकारी कर्जमुक्तीची घोषणा करून आठ महिने झाले आहेत. कारंजा तालुक्यात पडताळणीदरम्यान तलाठय़ांच्या अपूर्ण नोंदी निदर्शनात येत असल्याने पात्र शेतकरी सावकारी कर्जमुक्तीपासून वंचित राहण्याची भीती वर्तविली जात आहे. सावकारांकडून शेतकर्‍यांनी कर्ज घेतले आहे. सदर कर्ज माफ होण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने शेतकर्‍यांकडून प्रस्ताव मागविले होते. सदर प्रस्तावासोबत परिपूर्ण माहिती सादर करणे आवश्यक आहे; मात्र अनेक प्रस्तावांसोबत अपूर्ण माहिती असल्याने कर्जमुक्तीचा लाभ देणे कठीण ठरत आहे. कारंजा तालुक्यातील परवानधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या कर्जदाराने सोने गहाण ठेवतेवेळी सावकारी रेकॉर्डमध्ये अपुर्‍या नोंदी झाल्या. त्यामुळे संबंधित गावाच्या तलाठय़ांकडून या प्रस्तांवाची पात्रता पडताळणी करण्यास अडचणी निर्माण झाल्या. बहुतांश कर्जदार कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सावकारांकडून ३0 नोव्हेंबर २0१४ पर्यंंत कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांनी शेतकरी कुटुंबातील असल्याबाबत, त्यांचे कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने असलेल्या शेतजमिनीचे सातबारा उतारा व रेशनकार्डसंबंधी माहिती संबंधित गावच्या तलाठय़ांकडे २८ डिसेंबर २0१५ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पात्रता पडताळणी करणे सुलभ होणार आहे. काही शंका असल्यास तालुकास्तरावरील सहायक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे, कारंजा तालुका सहायक निबंधक बी. जी. जाधव यांनी केले.