शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने काजळेश्वरातील रस्त्यांना नाल्याचे रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST

कारंजा तालुक्यात गत सहा दिवसांपासून धोधो पाऊस कोसळत आहे. त्यात सोमवार व मंगळवारी काजळेश्वर येथे मुसळधार पाऊस आला. या ...

कारंजा तालुक्यात गत सहा दिवसांपासून धोधो पाऊस कोसळत आहे. त्यात सोमवार व मंगळवारी काजळेश्वर येथे मुसळधार पाऊस आला. या पावसामुळे उमा नदीला महापूर आला. नदी , नाल्याकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यात गावात सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्याचे योग्य व्यवस्थापन नसल्याने गावातील सर्वच रस्त्यांवर पाणी तुंबून त्यांना नाल्याचे रूप प्राप्त झाले होते. ठिकठिकाणी पाणी तुंबल्यामुळे गावातच पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याचा भास झाला. रस्त्यावर तुंबलेले पाणी अनेक ग्रामस्थांच्या घरात, गोठ्यात शिरले. यामुळे घराच्या भिंतीत पाणी मुरून काहींच्या घराची पडझडही झाली. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नसली तरी या प्रकारामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला.

-----------------

गतवर्षीही घडला होता प्रकार

थोडाही मुसळधार पाऊस पडला की, काजळेश्वर येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून राहते. यात शौचालयाचे, गटाराचे पाणी मिसळून ते ग्रामस्थांच्या घरात शिरते. गतवर्षीही मुसळधार पावसामुळे गावातील रस्त्यांना तलावाचे रूपच प्राप्त झाले होते. त्याची गंभीर दखल ग्रामपंचायतने घेतली नाही. त्यामुळे यंदाही त्या प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे.

००००००००००००००

साथरोग पसरण्याची भीती

गावात सांडपाणी व्यवस्थापन योग्य नसल्याने पावसाचे पाणीही रस्त्यावर तुंबून विषाणूंसह डासांच्या उत्पत्तीला वाव मिळत आहे. यामुळे गावात मलेरिया, डायरिया, विषमज्वरासह इतर साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून, ढिसाळ नियोजनामुळे ग्रामपंचायतप्रती रोषाचे वातावरण निर्माण होत आहे.

-----

पाणी व्यवस्थापन, धूर फवारणीची मागणी

गत दोन दिवस आलेल्या संततधार पावसाने काजळेश्वर येथील रस्त्यांवर पाणी तुंबले असून, रस्त्यांना तलावाचे रूप आले आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी व्यवस्थापन व धूर फवारणी करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती संघटनेचे सेवक प्रदीप उपाध्ये, महादेव जाधव, सोनुभाई आदींनी केली आहे.