दूषित पाण्यामुळे १३ शेळय़ा दगावल्या

By Admin | Updated: May 11, 2016 02:36 IST2016-05-11T02:36:40+5:302016-05-11T02:36:40+5:30

मंगरूळपीर तालुक्यातील घटना; उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांकडून पाहणी.

Due to contaminated water, 13 goats are dugane | दूषित पाण्यामुळे १३ शेळय़ा दगावल्या

दूषित पाण्यामुळे १३ शेळय़ा दगावल्या

मोहरी (जि. वाशिम): मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी येथे युरिया मि२िँं१्रूँं१त पाणी पिल्यामुळे १३ शेळय़ा दगावल्याची घटना ९ मे रोजी सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची पाहणी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी केली.
मोहरी शेतशिवारात मोहरी-झाडगाव मार्गावर रुखमागद गुलाबराव म्हातारमारे यांचे शेत आहे. या शेतात त्यांनी काकडीची लागवड केली असून, याच काकडीला युरिया खत देण्यासाठी त्यांनी पाण्यात युरियाचे मिश्रण करून द्रावण तयार केले होते. सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास शेळय़ांचा कळप त्यांच्या शेतात आला. सद्यस्थितीत पाण्यासाठी सर्वत्र हाहाकार उडाला असून, तहानलेल्या शेळय़ांनी म्हातारमारे यांच्या शेतात काकडीला देण्यासाठी तयार केलेले युरीयाचे द्रावण काही कळायच्या आतच पिऊन टाकले. त्यानंतर काही वेळातच या १३ ही शेळय़ा गतप्राण झाल्या.

Web Title: Due to contaminated water, 13 goats are dugane