शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय इमारतींची दुरवस्था

By admin | Updated: September 26, 2014 00:31 IST

वाशिम जिल्ह्यातील तीन तालुक्यातील अनेक इमारती मोडकळीस.

दादाराव गायकवाड / कारंजा लाडवाशिम जिल्हय़ातील अनेक शासकीय इमारतीची अवस्था वाईट झाली असून, यामध्ये विविध शासकीय कार्यालयांसह, कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांचाही समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या सर्व इमारतीच्या डागडुजीची मागणी संबंधित विभागांकडून करण्यात आली आहे. वाशिम जिल्हय़ातील मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात अनेक शासकीय इमारतीची अवस्था वाईट झाली आहे. यामध्ये गृह विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील क ार्यालये आणि कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. मंगरुळपीर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येणार्‍या शासकीय इमारतींमध्ये पोलिस स्टेशन आणि पोलिसांची निवासस्थाने, तहसीलदार निवासस्थान, शासकीय गोदाम, ग्रामीण रुग्णालय आणि त्यामधील कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांची मोठय़ा प्रमाणात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्याशिवाय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्र माध्यमिक विद्यालय, तालुका भूमिअभिलेख कार्यालय आदि ठिकाणांवर किरकोळ दुरुस्तीही आवश्यक आहे. मानोरा तालुक्यातही पोलिस निरीक्षक, तहसीलदार निवासस्थान, तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, तसेच धान्य गोदाम आदि शासकीय इमारतींची दुरुस्ती आवश्यक झाली आहे. कारंजा येथे तहसील कार्यालयाच्या छतावरील कवेलू फुटले असून, शासकीय धान्य गोदामाच्या खिडक्यांची मोडतोड झाली आहे. तहसील कार्यालयाच्या दुरुस्तीसंदर्भात पाठपुरावाही करण्यात आला आहे. ** सा. बां. उपविभागाकडून दुरुस्तीचे प्रस्ताव सादरवाशिम जिल्हय़ातील मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यातील विविध शासकीय इमारतीच्या दुरुस्तीसंदर्भात संबंधित विभागाकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार मंगरुळपीर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या वतीने अंदाजपत्रक तयार करून दुरुस्तीचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता वाशिम यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग मंगरुळपीर यांच्याकडून मंगरुळपीर तालुक्यातील एकूण २७, तर मानोरा तालुक्यातून एकूण १२ शासकीय इमारतीच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून जुलै २0१४ ला सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठांकडे पाठविण्यात आले असल्याचे सार्वजनिक बांधक ाम उपविभागाकडून सांगण्यात आले.