शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीचे पैसे मिळालेच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 13:48 IST

०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीत करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची मजूरी संबंधित मजुरांना तीन वर्षानंतरही मिळाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रिसोड तालुक्यातील चिखली-कवठा या मार्गालगत २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीत करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची मजूरी संबंधित मजुरांना तीन वर्षानंतरही मिळाली नाही. याप्रकरणी चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवालासह चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी उत्तम फड यांनी रिसोड वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांना २० जानेवारी रोजी दिले.पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी गत काही वर्षांपासून वृक्षारोपण मोहिम राबविली जात आहे. सन २०१४-१५, २०१५-१६ आणि २०१६-१७ या कालावधीत रिसोड तालुक्यातील चिखली ते कवठा या मार्गालगत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केल्यानंतर मजुरांना मजुरीचे पैसे मिळणे अपेक्षीत होते. परंतू, अद्यापही पैसे मिळाले नाहीत. यासंदर्भात युवरात सिताराम भगत यांनी तालुकास्तर तसेच जिल्हास्तरावरही अनेक वेळा तक्रारी केल्या. परंतू, त्याची दखल घेण्यात आली नाही. शेवटी भगत यांनी मुख्य वनसंरक्षक यवतमाळ यांच्याकडे तक्रार करताच, जलदगतीने चौकशीची चक्रे फिरली. याप्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश मुख्य वनसंरक्षकांनी वाशिमच्या सामाजिक वनीकरण विभागाला दिले. त्यानुसार विभागीय वनअधिकारी फड यांनी याप्रकरणी रिसोड वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांसह संबंधितांना चौकशी करण्याचे निर्देश २० जानेवारी रोजी दिले. २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीतील वृक्षारोपणाची मजुरी संबंधितांना अद्याप मिळाली नाही, याप्रकरणी सविस्तर चौकशी करावी, अहवाल सादर करावा, असे निर्देश फड यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिम