शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पीपीई कीटमुळे बिघडतेय डॉक्टर, परिचारिकांचे आरोग्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 12:19 IST

पीपीई कीट व मास्कमुळे त्वचेच्या समस्याही निर्माण होतात, असे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. विठ्ठल गोटे यांनी सांगितले.

वाशिम : कोरोनारुग्णांच्या उपचारार्थ सलग सहा ते आठ तास पीपीई कीट घालून सेवा देणाऱ्या डॉक्टरांचेच आरोग्य धोक्यात सापडत आहे. या काळात या डॉक्टरांना ना लघुशंकेला जाता येत, ना पाणी पिता येत. श्वास घेण्यातही अडचणी येत आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालय यासह तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर, एक खासगी कोविड हॉस्पिटल येथे रुग्णांवर उपचार केले जात असून, येथे कार्यरत डॉक्टरांना तसेच परिचारिका, आरोग्य कर्मचारी, चाचणी करणारे तंत्रज्ञ आदींनाही संरक्षणासाठी व संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून शासनाकडून लॅमिनेटेड कीट व एन-९५ मास्क पुरविण्यात आले. पीपीई कीट घालून डॉक्टर, कर्मचारी हे रुग्णसेवेत कार्यरत असताना अनेक समस्यांचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पीपीई कीट व मास्कमुळे त्वचेच्या समस्याही निर्माण होतात, असे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. विठ्ठल गोटे यांनी सांगितले.

सरकारी कोविड रुग्णालयांमध्ये डॉक्टर, कर्मचाऱ्यांना आठ तास सेवा द्यावी लागते. या कालावधीत पीपीई कीट घालून राहावे लागते. घाम येणे, लघुशंकेला जाता न येणे, कान व नाकावर व्रण येणे आदी थोड्याफार समस्या जाणवतात.- डॉ. अविनाश आहेर,जिल्हा आरोग्य अधिकारीसतत सहा ते आठ तास पीपीई कीट घातल्यामुळे श्वास घेण्यातही काही प्रमाणात अडचणी येतात. या कालावधीत पाणी पिता येत नाही किंवा लघुशंकेला जाता येत नसल्याने डिहायड्रेशन, किडनीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- डॉ. अनिल कावरखे,अध्यक्ष, आयएमए वाशिम

टॅग्स :washimवाशिमdoctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या