शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात ना शुद्ध पाणी, ना शौचालय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:17 IST

सामाजिक न्याय विभागाकडून चालविल्या जाणार्‍या येथील शासकीय बहूद्देशीय संमिश्र अपंग केंद्रात वास्तव्याला असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरविण्याकामी प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. हात, पाय यासह इतर शारीरिक व्याधींनी त्रस्त असतानाही जीवन जगण्याची धडपड करणार्‍या या विद्यार्थ्यांना गाळ साचलेल्या सिमेंटच्या टाक्यात साठविल्या जाणारे विहिरीचे अशुद्ध पाणी प्यावे लागत असून, शौचालयांअभावी पायर्‍या उतरून बाहेर उघड्यावर शौचास जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने रविवारी केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये उजागर झाला.

ठळक मुद्देस्टिंग ऑपरेशनसामाजिक न्याय विभागाचे दुर्लक्ष

सुनील काकडे। लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सामाजिक न्याय विभागाकडून चालविल्या जाणार्‍या येथील शासकीय बहूद्देशीय संमिश्र अपंग केंद्रात वास्तव्याला असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरविण्याकामी प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. हात, पाय यासह इतर शारीरिक व्याधींनी त्रस्त असतानाही जीवन जगण्याची धडपड करणार्‍या या विद्यार्थ्यांना गाळ साचलेल्या सिमेंटच्या टाक्यात साठविल्या जाणारे विहिरीचे अशुद्ध पाणी प्यावे लागत असून, शौचालयांअभावी पायर्‍या उतरून बाहेर उघड्यावर शौचास जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने रविवारी केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये उजागर झाला.शासकीय बहूद्देशीय संमिश्र अपंग केंद्रात यावर्षी २८ विद्यार्थी वास्तव्याला असून, अधिकांश विद्यार्थ्यांना पायाचा व्यंग असल्याने धड चालताही येत नाही. असे असताना सर्वच विद्यार्थ्यांना इमारतीमधील दुसर्‍या मजल्यावर एका हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे, तर विद्यार्थ्यांच्या आंघोळीची सोय चक्क तिसर्‍या मजल्यावर करण्यात आली आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून चालविल्या जात असलेल्या या वसतिगृहात अद्याप एकही शौचालय उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे हात-पायांनी अधू असताना, डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नसताना रात्री-बेरात्री गाजर गवतासह इतर झाडेझुडुपे वाढलेल्या पटांगणात शौचास जावे लागते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. वसतिगृहाच्या तिसर्‍या मजल्याच्याही वर असलेल्या सिमेंटच्या जुनाट टाक्यामध्ये विहिरीचे पाणी साठवून ते पाणी विद्यार्थ्यांना पाजले जात आहे. या टाक्याची पाहणी केली असता, त्यात मोठय़ा प्रमाणात गाळ साचल्याचे निदर्शनास आले. यासह पाण्यावर दूषित घटकांचा तरंग आल्याचेही स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसून आले. हे पाणी निर्जंंतुक करण्याची कुठलीच सोय अद्याप या वसतिगृहात उभारल्या गेलेली नाही. विद्यार्थी ज्या हॉलमध्ये झोपतात, त्या हॉलचीही दुरवस्था झाली असून, गाद्या प्रचंड प्रमाणात मळालेल्या आहेत. 

कित्येक आले-गेले; प्रश्न नाही सुटले!शासकीय बहूद्देशीय संमिश्र अपंग केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गराड्यात दोन्ही पायांनी अधू असलेल्या एका निरागस विद्यार्थ्याने यावेळी बिनदिक्कतपणे वस्तुस्थिती विशद केली. तो म्हणाला, आजपर्यंंत कित्येक आले आणि केवळ फोटो काढून गेले; पण आमचे मूलभूत प्रश्न आजही कायम आहेत. तथापि, त्याच्या या वक्तव्याची दखल प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.