लोहगाव महागाववासीयांना दूषित पाणीपुरवठा

By Admin | Updated: December 3, 2014 23:38 IST2014-12-03T23:38:32+5:302014-12-03T23:38:32+5:30

ग्रामपंचायतचे दुर्लक्ष : ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात.

Distributed water supply to Lohaggaon Mahaagawas | लोहगाव महागाववासीयांना दूषित पाणीपुरवठा

लोहगाव महागाववासीयांना दूषित पाणीपुरवठा

लोहगाव महागाव (जि. वाशिम): नळ योजनेच्या पाईपलाईनमधून ग्रामस्थांना दुषित पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले असून, याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे. येथील ग्रामस्थांना ग्रामपंचायतमार्फत गावापासून चार ते पाच कि.मी. अंतरावरील विहीरीवरून नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पण या योजनेच्या देखभाल व दुरूस् तीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने पाईपलाईन जंग खावून काही ठिकाणी फुटली आहे. परिणामी घाण पाण्याच्या डबक्यातील पाणी पाईपलाईन शिरत आहे. हे दुषित ग्रामस्थ दररोज पि त असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याशिवाय पाण्याच्या टाकी वेळोवेळी स्वच्छ करण्यात येत नाही. तसेच पाणी निर्जंंतूक करण्यासाठी त्यामध्ये पावडरही टाकण्यात येत नाही. त्यामुळे विविध आजार डोके वर काढत आहे. काही दिवसापूर्वी डेंग्यूसदृश आजाराचे रूग्णही येथे आढळून आले आहे. त्या पृष्ठभूमिवर ग्रामपंचायतने नळ पाणी पुरवठय़ाची पाई पलाईन दुरूस्त करणे गरजेचे ठरत आहे.

*नारूसदृश कृमी आढळली
लोहगाव येथील माजी पोलीस पाटील भिमसिंग राठोड यांच्याकडे ग्रामपंचायतच्या नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. बुधवारला त्यांना पाण्यात नारूसदृश कृमी आढळली. त्यामुळे गावकर्‍यात भी तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Distributed water supply to Lohaggaon Mahaagawas